आता दिवाळी संपल्यानंतर, Toyota ने भारतीय ऑटो बाजारपेठेत मोठा धमाका केलाय. कंपनीने आपली नवी शक्तिशाली आणि लोकप्रिय SUV Innova Hycross चे नवीन मर्यादित-व्हर्जन मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर केले आहे. हे नवीन व्हर्जन आणखी जबरदस्त फीचर्ससह बाजारात दाखल केले गेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नव्या मॉडेलमध्ये काय आहे खास?
कंपनीने या नवीन आवृत्तीच्या आतील आणि बाहेरील भागात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. बाह्यभागात फारच थोडे बदल करण्यात आले आहेत. कारच्या पुढील भागात क्रोम ग्रिल देण्यात आली आहे. याशिवाय मागील बंपरमध्ये नवीन फॉक्स सिल्व्हर स्किड प्लेट देण्यात आली आहे. मोठ्या अलॉय व्हील्स उच्च ट्रिममध्ये उपलब्ध आहेत.
(हे ही वाचा : महिंद्राच्या ‘या’ कारसाठी शोरुम्समध्ये तुफान गर्दी; तर टाटाच्या दोन कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ? नेमकं कारण काय… )
याशिवाय कंपनीने कारच्या इंटीरियरमध्येही काही बदल केले आहेत. कंपनीने कारच्या डॅशबोर्डसाठी सॉफ्ट टच, ब्राऊन फिनिशचा वापर केला आहे. खिडकीच्या नियंत्रणाजवळ लाकडी ट्रिम्स दिसतात. सीटवर तपकिरी आणि काळ्या रंगाचे ड्युअल टोन सीट कव्हर आहे. ही नवीन आवृत्ती सात आणि आठ सीटर मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर ही कार २.० लीटर पेट्रोल इंजिनसह येते. ही कार जास्तीत जास्त १७२ bhp ची पॉवर आणि २०५ nM चा कमाल टॉर्क जनरेट करते. हे इंजिन CVT गिअरबॉक्ससह येते. जर आपण मायलेजबद्दल बोललो तर, ही MPV पेट्रोल इंजिनमध्ये १६.१३kmpl आणि हायब्रिड प्रकारात २३.२४kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी वैशिष्ट्येही या एमपीव्हीमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ६ एअरबॅग्ज, EBD सह ABS, वाहन स्थिरता नियंत्रण (VSC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), ३६०-डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स यांचा समावेश आहे.
किंमत
ही नवीन आवृत्ती सध्याच्या मॉडेलपेक्षा ४०,००० रुपयांनी महाग आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत २०.०७ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने हे नवीन एडिशन नवीन कलर अर्थात काही इंटीरियर आणि एक्सटीरियरसह लॉन्च केले आहे. या कारची किंमत २०.०७ लाख ते २०.२२ लाख रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. पण इनोव्हा हायक्रॉस जीएक्स लिमिटेड एडिशन फक्त स्टॉक असेपर्यंत बाजारात उपलब्ध असेल, अशी माहिती आहे