Hilux Black Edition Features : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज भारतात नवीन हिलक्स ब्लॅक एडिशन (Hilux Black Edition) लाँच केली आहे, जी कार तुम्हाला ऑफ रोडिंगसह नेहमीच्या प्रवासासाठी वापरता येणार आहे. हिलक्स ब्लॅक एडिशनमध्ये २.८ लिटर फोर-सिलेंडर टर्बो-डिझेल इंजिन आहे, जे ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (५०० एनएम टॉर्क) सह उपलब्ध असणार आहे. त्याची 4X4 ड्राइव्हट्रेन ऑफ-रोड अनुभव , ५०० एनएम टॉर्क, ७०० मिमी वॉटर वेडिंग क्षमता देते.

हिलक्स ब्लॅक एडिशनमध्ये पूर्णपणे काळ्या रंगाची थीम आहे. मेन डिझाइनमध्ये काळ्या रंगाची फ्रंट रेडिएटर ग्रिल, मस्क्युलर बोनेट लाइन आणि कस्टमाइज्ड हब कॅप्ससह १८ इंचाची ब्लॅक अलॉय व्हील्स समाविष्ट असणार आहे. ब्लॅक ORVM कव्हर्स, डोअर हँडल्स, फेंडर गार्निश, फ्युएल लिड गार्निशसारखे अतिरिक्त स्टायलिंग एलिमेंट्स गाडीला आकर्षक लूक देतात. फ्रंट बंपरमध्ये अंडर रन आहे, जो स्पोर्टी टच गाडीला जोडतो. मॉडर्न आणि प्रीमियम सौंदर्याला पूर्ण करणारे शार्प स्वीप्ट-बॅक एलईडी हेडलाइट्स, एलईडी रिअर कॉम्बिनेशन लॅम्पसुद्धा देण्यात आले आहेत.

हायलक्स ब्लॅक एडिशनमध्ये ७ एसआरएस एअरबॅग्ज, वाहन स्टॅबिलिटी कण्ट्रोल (व्हीएससी), ट्रॅक्शन नियंत्रण (टीसी), इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक (ईडीएल) आणि उत्कृष्ट हाताळणी आणि नियंत्रणासाठी ऑटोमॅटिक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल (एएलएसडी) आहेत. याव्यतिरिक्त, हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी) आणि डाउनहिल असिस्ट कंट्रोल (डीएसी) उतार आणि खडबडीत रस्त्यावर अधिक सुरक्षा तर फ्रंट पार्किंग सेन्सर्स अरुंद जागांमध्ये सुविधा देतात, ज्यामुळे आत्मविश्वास आणि सुरक्षित ड्राइव्ह सुनिश्चित होते.

तसेच हिलक्स ब्लॅक एडिशनमध्ये ड्रायव्हर फोकस्ड प्रीमियम केबिन आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आरामदायी वातावरण आहे. आतील भाग आलिशान लेदर अपहोल्स्ट्री, वैयक्तिकृत आरामासाठी ड्युअल-झोन, ऑटोमॅटिक क्लायमेट कण्ट्रोल सिस्टम, आठ इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, ज्यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले आहे. आरामदायी सुविधा वाढवणाऱ्या अतिरिक्त फीचर्समध्ये eight way पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक डिमिंगसाठी इलेक्ट्रोक्रोमिक IRVM आणि ऑडिओ डिस्प्लेसह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांचा समावेश आहे.

हिलक्स ब्लॅक एडिशनची किंमत

अधिक सोयीसाठी हिलक्स ब्लॅक एडिशनमध्ये इंजिन पुश स्टार्ट/स्टॉप बटणासह स्मार्ट एंट्री, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि इलेक्ट्रिक ॲडजस्ट अँड रिट्रॅक्ट ओआरव्हीएमसुद्धा समाविष्ट असणार आहे. क्रूझ कंट्रोलमुळे लांब पल्ल्याचे ड्रायव्हिंग सोपे होईल, ज्यामुळे हिलक्स ब्लॅक एडिशन शहरी प्रवास आणि खडतर प्रवासातही एक खास पार्टनर बनणार आहे. हिलक्स ब्लॅक एडिशनची किंमत ३७,९०,००० रुपये आहे (एक्स-शोरूम पातळीवर देशभरात किंमत सारखीच असेल). भारतातील सर्व टोयोटा डीलरशिपमध्ये ग्राहकांसाठी टोयोटा हिलक्स ब्लॅक एडिशनची विक्री सुद्धा सुरु झाली आहे.

Story img Loader