Toyota Hilux Gets a Massive Rs 3.60 Lakh Price Cut: जपानी कार निर्माता कंपनी टोयोटाने नुकत्याच लाँच केलेल्या पिक-अप ट्रकच्या किमतीत कमालीची घट केली आहे. जर तुम्ही टोयोटा हिलक्सचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने टोयोटा हिलक्सच्या बेस व्हेरिएंटची किंमत ३.५९ लाख रुपयांनी कमी केली आहे. यानंतर आता टोयोटा हिलक्सच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ३०.४० लाख रुपये झाली आहे. दुसरीकडे, त्याच्या हाय मॅन्युअल आणि हाय ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
कंपनीने त्याच्या टॉप मॅन्युअल वेरिएंटची किंमत १.३५ लाख आणि टॉप ऑटोमॅटिक १.१० लाख रुपयांनी वाढवली आहे, ज्याची कमाल किंमत ३७.९० लाख (एक्स-शोरूम) झाली आहे.
Toyota Hilux इंजिन
गेल्या वर्षी टोयोटाने हा पिक-अप ट्रक भारतीय बाजारपेठेत डबल-कॅब बॉडी स्टाइलसह सादर केला होता. कंपनीने बेस-स्पेक स्टँडर्ड एमटी, हाय एमटी आणि हाय एटी या एकूण तीन प्रकारांसह लाँच केले होते. ४x४ पिक-अप ट्रक २.८-लिटर चार-सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. मॅन्युअल ट्रान्समिशनसह, ते २०१ bhp पॉवर आणि ४२० Nm टॉर्क बनवते, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, त्याचा टॉर्क ५०० Nm पर्यंत वाढतो.
(हे ही वाचा : Baleno-Punch चा गेम होणार; मारुती आणतेय देशातील सर्वात सुरक्षित कार, किंमत ७ लाखांपेक्षाही कमी )
Toyota Hilux डिझाइन
Toyota Hilux चा पुढचा भाग फॉर्च्युनरसारखा दिसतो. कंपनीने टोयोटा हिलक्सची बॉडी ऑफरोडिंगच्या उद्देशाने तयार केली आहे. पुढच्या भागाबद्दल बोलायचे झाल्यास, टोयोटा हिलक्समध्ये हेक्सागोनल क्रोम ग्रिल आणि स्वेप्ट-बॅक एलईडी हेडलॅम्प आहेत.
पिकअप ट्रकची रचना त्याच iMV बॉडी-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्मवर केली गेली आहे जी फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा यांना शक्ती देते. परिमाणांच्या बाबतीत, टोयोटा हिलक्सची लांबी ५,३२५ मिमी, रुंदी १,८५५ मिमी, उंची १,८१५ मिमी आणि ३,०८५ मिमी चा व्हीलबेस आहे. या पिकअप ट्रकमध्ये ४७० लिटरचा भार वाहून नेला जाऊ शकतो.
(हे ही वाचा : यंदाच्या गुढीपाडव्याला अवघ्या १० हजारात घरी आणा महिलांसाठी स्टायलिश स्कूटी, ७१ kmpl मायलेज अन्… )
Toyota Hilux वैशिष्ट्ये
कंपनी टोयोटा हिलक्सवर सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि स्टँडर्ड फोर-व्हील-ड्राइव्ह सिस्टम ऑफर करते. अॅपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, लेदर सीट अपहोल्स्ट्री, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, माउंटेड कंट्रोल्ससह स्टीयरिंग व्हील, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारख्या वैशिष्ट्यांचाही समावेश आहे.