टोयोटा मोटर कॉर्पोरेशनने भारतात आपला लाइफस्टाइल पिकअप ट्रक टोयोटा हिलक्सचे अनावरण केले आहे. आज २० जानेवारी रोजी, टोयोटाच्या शक्तिशाली पिकअप ट्रक हिलक्सचे अनावरण करण्यात आले, त्यानंतर त्याचे स्वरूप आणि डिझाइन तसेच फीचर्सही सांगण्यात आले. मार्चमध्ये त्याची किंमत जाहीर केली जाईल. सध्या भारतात टोयोटा हिलक्सचे (Toyota Hilux) बुकिंग सुरु झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आहेत ५ स्टार सेफ्टी रेटिंग

टोयोटा हिलक्स, भारतातील नवीन लाइफस्टाइल पिकअप ट्रक, कंपनीच्या एमपीवी टोयोटा इनोवा क्रिस्टा आणि एसयूवी टोयोटा फॉर्च्यूनर प्रमाणेच नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय वाहन प्लॅटफॉर्मवर विकसित केले गेले आहे. ४×२ तसेच ४×४ सिस्टीमसह सुसज्ज, टोयोटा हिलक्स ४WD पर्यायामध्ये देखील ऑफर केली जाईल. या टोयोटा पिकअप ट्रकला ASEAN NCAP मध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ५ मीटरपेक्षा जास्त उंच असलेल्या या पिकअप ट्रकचा लुक आणि डिझाइन पियानो ब्लॅक ग्रिलच्या भोवती क्रोमसह जोरदार शक्तिशाली आहे. यात LED प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि DRL तसेच L आकारात फॉग लॅम्प मिळतात. या पिकअप ट्रकमध्ये १८ इंच अलॉय व्हील्स असतील.

(हे ही वाचा:‘या’ कारला एकाच दिवशी मिळाले ७७३८ बुकिंग; भारतात होतेय प्रचंड मागणी)

आहे शक्तिशाली इंजिन

टोयोटा हिलक्सच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात २.८ लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे, जे २०४bhp पॉवर आणि ४२०Nm टॉर्क जनरेट करते. हे ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायामध्ये देण्यात आले आहे. इतर फीचर्समध्ये अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह ८ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, लेदर अपहोल्स्ट्री, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, पुश स्टार्ट-स्टॉप बटण, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि हीट रिजेक्शन विंडो यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा: मारुती सुझुकीची वाहने महागली, ४.३% टक्क्यांपर्यंत वाढल्या किमती)

(फोटो:PR)

(हे ही वाचा:लोकसत्ता विश्लेषण: सर्व कारमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य! जाणून घ्या काय आहे या घोषणेचा अर्थ आणि किमतीवर होणारा परिणाम)

उत्तम सेफ्टी फीचर्स

टोयोटा पिकअप ट्रकमध्ये ७ एअरबॅग्ज, रिव्हर्स कॅमेरा, रियर आणि फ्रंट पार्किंग कॅमेरे, ऍक्टिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल, ABS-EBD, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल्स, ड्रायव्हर सीट कंट्रोल आणि टायर अँगल मॉनिटर यासह इतर अनेक सुरक्षेशी संबंधित फीचर्स आहेत. टोयोटाच्या या पिकअप ट्रकची भारतात आतुरतेने वाट पाहिली जात आहे आणि जर तुम्हाला हा ट्रक घेयचा असेल तर तुम्ही एक लाख रुपयांच्या टोकन रकमेवरही तो बुक करू शकता. भारतात हा ट्रक २५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या श्रेणीमध्ये ऑफर केली जाऊ शकते

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota hilux unveiled in india booking of this lifestyle pickup truck starts in india ttg