Toyota Innova Hycross Price Hike: टोयोटा किर्लोस्कर ही भारतातातील लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आता कंपनीने लॉन्च केलेल्या आपल्या इनोव्हा हायक्रॉस या मॉडेलच्या किंमतीमध्ये केली आहे. ही या मॉडेलच्या किंमतीमध्ये झालेली दुसरी वाढ आहे. सध्या वाढ करण्यात आलेली किंमत ही या कारच्या हायब्रीड व्हेरिएंटमध्ये करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Innova Hycross चे फीचर्स

डिझेल इंजिनचा पर्याय नसतानाही या कारने भारतीय ऑटो मार्केटमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. हायक्रॉसमध्ये नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड असे २.०L ४ सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे १७२ बीएचपीची पॉवर आणि २०५ एनएम इतके टॉर्क जनरेट करते. हे इंजिन कारच्या CVT गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त drivespark ने दिले आहे.

हेही वाचा : Toyota Price Hike: टोयोटाने आपल्या कार्सच्या किंमतीमध्ये केली वाढ; ‘या’ मॉडेल्सचा आहे समावेश, जाणून घ्या

त्याशिवाय याच्या हायब्रीड पॉवरट्रेनमध्ये २.०L चे ४ सिलेंडर असणारे नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड अ‍ॅटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर उपलब्ध आहे. जे १८४.८ बीएचपीची पॉवर आणि २०६ एनएम इतके टॉर्क जनरेट करते.

इनोव्हा क्रिस्टाच्या तुलनेत इनोव्हा हायक्रॉस २० मिमी लांब आणि २० मिमी रुंद आहे. याशिवाय पुढील आणि मागील चाकांमध्ये १०० मिमी इतकी अतिरिक्त जागा आहे. यावर्षी हायक्रॉसच्या किंमतीमध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आलेली असली तरी देखील या वाहनाच्या विक्रीमध्ये कोणतीही घट झालेली नाही.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ (image credit -financial express)

हेही वाचा : BMW ने लॉन्च केली ‘ही’ शानदार कार; ४.५ सेकंदात पकडते तब्बल १०० किमीचा वेग, जाणून घ्या किंमत

किती वाढली किंमत ?

या MPV कारच्या किंमतीत या वर्षातील ही दुसरी वाढ आहे. इनोव्हा हायक्रॉसच्या किंमतीमध्ये २७,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. २७,००० रुपयांची वाढ झाल्याने आता या MPV कारचे VX मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला २५.०३ लाख (एक्स शोरूम) रुपये खरेच करावे लागू शकतात. याशिवाय आता पेट्रोल इंजिनसह ट्री-लेव्हल ‘G’ व्हेरियंटसाठी टोयोटा हायक्रॉसच्या सुरुवातीची किंमत ही १८.५५ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरु होतील.