Toyota एक आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स कंपनीं लॉन्च करतच असते. टोयोटा किर्लोस्कर मोटर्स कंपनीने नुकतीच त्यांच्या लोकप्रिय आणि शक्तिशाली SUV इनोव्हा ख्रिस्त याच्या टॉप ग्रेड व्हेरिएंटची किंमत जाहीर केली आहे. कंपनीने इनोव्हा क्रिस्टाच्या २ टॉप ग्रेड्स म्हणजेच ZX आणि VX यांच्या किंमती जाहीर केल्या आहेत.

Toyota Innova Crysta चे फीचर्स

इनोव्हा क्रिस्टा हे मॉडेल नवीन आणि स्टायलिश फ्रंट डिझाईनसह येते. ही कार भारतातील उद्योगपती, कार्पोरेट्स क्षेत्राला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा क्रिस्टा या मॉडेलमध्ये कंपनीने २.४ लिटरचे डिझेल इंजिन दिले आहे. जे ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्स्मिशनसह येते. हे इंजिन इको आणि पॉवर ड्राइव्ह मोड्सवर काम करते. तसेच याचे इंजिन हे ११० Kw ची पॉवर आणि ३४३ nM चा टॉर्क जनरेट करते.

Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
ChatGPT now has its own web search engine
OpenAI’s Search Engine : OpenAI चे नवे सर्च इंजिन! अचूक माहिती शोधणे होणार सोपे; विनामूल्य करता येईल वापर
tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
baby john movie teaser
Video: ‘जवान’नंतर अ‍ॅटलीच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, वरुण धवनच्या अ‍ॅक्शनने अन् जॅकी श्रॉफ यांच्या लूकने वेधलं लक्ष
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
Analog Space Mission :
Analog Space Mission : भारताची पहिली ॲनालॉग स्पेस मिशन लडाखमध्ये सुरू; इस्रोची ही अंतराळ मोहीम काय आहे?

हेही वाचा : TVS Motor Sales Report April 2023: टीव्हीएस मोटर्सने एप्रिल महिन्यात केली तब्बल ‘इतक्या’ लाख युनिट्सची विक्री

सेफ्टी फीचर्स

वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी टोयोटा इनोव्हाच्या नवीन मॉडेलमध्ये ७ SRS एअरबॅग्स दिल्या आहेत. त्याशिवाय कारमध्ये रिअल आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) आणि ब्रेक असिस्ट्स अणि ३ पॉइंट सीटबेल्ट आणि हेडरेस्ट्स सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.

नवीन इनोव्हा क्रिस्टामध्ये मिळणार ७एअरबॅग्स (Image Credit-toyotabharat.com)

टोयोटाच्या या कारमध्ये रियाल ऑटो एसी, ८-वे पॉवर ड्रायव्हर सीट, स्मार्ट एंट्री सिस्टीम, सीट बॅक टेबल, टीएफटी एमआयडी ड्राइव्ह माहिती, लेदर सीट कलर ऑप्शन्स यांसारखी आरामदायी फीचर्स देण्यात आली आहेत. कारमध्ये 8-इंचाचा टचस्क्रीन ऑडिओ प्लेकास्ट देण्यात आला आहे, जो Android आणि Apple CarPlay सह येतो.

नवीन इनोव्हा क्रिस्टा (Image Credit-toyotabharat.com)

हेही वाचा : टोयोटाची ‘ही’ MPV कार Mahindra Scorpio चा खेळ संपवणार, कमी किमतीत मिळतील धासू फीचर्स

काय आहे किंमत ?

नवीन Toyota Innova Crysta या मॉडेलची किंमत कंपनीने २३.७९ लाख (एक्सशोरूम) रुपये ठेवली आहे. तसेच याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत २५.४३ लाख रुपये इतकी आहे. यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की वेगवेगळ्या मॉडेलनुसार आणि वेगवेगळ्या रंगानुसार प्रत्येक मॉडेलची किंमत ही वेगवेगळी आहे.