टोयोटा किर्लोस्कर ही एक उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने आपल्या काही कार्सच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. या कारमध्ये अर्बन क्रूझर हायरायडर आणि इनोव्हा हायक्रॉस तसेच ग्लान्झा आणि कॅमरी यांचा समावेश आहे. कार्सच्या वाढलेल्या किंमतीमागे कंपनीच्या उत्पादन खर्चामध्ये झालेली झालेली वाढ हेच कारण असण्याची शक्यता आहे. मात्र, फॉर्च्युनर हिलक्स, वेलफायर आणि नवीन इनोव्हा क्रिस्टा यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Toyota Hyryder: टोयोटा Hyrider च्या किंमतीमध्ये २,००० ते ६०,००० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. याच्या एंट्री लेव्हल एस हायब्रीड व्हेरिएंटमध्ये सर्वात जास्त ६० हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर इतर दोन हायब्रीड मॉडेल्सच्या किंमती २५,००० रुपयांनी वाढल्या आहेत. एस ट्रिममध्ये २० हजार रुपयांची वाढ झाली आहे आणि जी आणि व्ही व्हेरिएंटमध्ये २ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
हेही वाचा : BMW चे ‘हे’ दमदार मॉडेल भारतात झाले लॉन्च; अत्याधुनिक फीचर्ससह मिळणार…, जाणून घ्या
Innova Hycross : टोयोटा कंपनीने आपल्या हायक्रॉस कारच्या किंमतीमध्ये २७ हजार रुपयांची वाढ केली आहे. मात्र ही वाढ केवळ हायब्रिड मॉडेलसाठीच करण्यात आली आहे. याचे VX, VX(O), ZX आणि ZX(O) हायब्रिड व्हेरीएंट 27 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी कार लॅान्च झाल्यावर हायक्रॉस मॉडेलच्या किंमतीमध्ये ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याआधी मार्च महिन्यात ७५ हजार रुपयांनी वाढली होती. सध्या पेट्रोलच्या मॉडेलच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
Toyota Glanza and Camry: कंपनीने आपल्या ग्लान्झा हॅचबॅक आणि कॅमरी सेडान या मॉडेलच्या किंमतीमध्ये देखील वाढ केली आहे. ग्लान्झाच्या सर्व व्हेरीएंटच्या किंमतीमध्ये ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. ग्लान्झाची किंमत सध्या ६.७१ लाख ते ९.९९ लाख यामध्ये आहे. तर कॅमरी सेडानच्या किंमतीमध्ये ४६ हजार रुपयांची वाढ झाली आहे.