Toyota ही एक लोकप्रिय वाहन निर्माती कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी कायमच नवनवीन मॉडेल्स लॉन्च करतच असते. टोयोटा ऑगस्ट २०२३ या महिन्याच्या अखेरीस आपली Rumion MPV लॉन्च करणार आहे. त्याद्धी त्याचे बुकिंग सुरू होईल. उपलब्ध माहितीनुसार, या MPV ची डिलिव्हरी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. सध्या या एमपीव्हीची विक्री दक्षिण आफ्रिकेमध्ये केली जाते. Rumion हे मॉडेल मारूती सुझुकी अर्टिगावर आधारित आहे. हे मॉडेल टोयोटा आणि मारूती सुझुकी यांच्यामधील चौथे बॅज इंजिनिअर्ड मॉडेल आहे. हे मॉडेल मारूती सुझुकी तयार करणार असून याचा पुरवठा देखील मारूती सुझुकी करणार आहे.

Rumion सह टोयोटाकडे देशातील सर्वात मोठा MPV पोर्टफोलिओ आहे. ज्यामध्ये इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस आणि वेलफायर यांचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त autocarindia ने दिले आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: शत्रूचे सत्य समोर आणण्यासाठी तुळजाने केला प्लॅन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
Bhaskar Bhopi Marg which connects two tourist spots of Madh and Marve will be widened
मढ मार्वे रस्ता चौपट रुंद होणार, भास्कर भोपी मार्गाचे महापालिका करणार रुंदीकरण
hmpv task force jj hospital dean dr pallavi saple
एचएमपीव्हीच्या प्रतिबंधासाठी कृती दलाची स्थापना, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती
fisheries department monitor Konkan coast through drones to prevent intrusion of foreign fishing boats
कोकण किनारपट्टीतील समुद्रावर आता ड्रोनची नजर, परप्रांतिय घुसखोरी आणि एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाचा उपाय
HMPV Virus Causes Symptoms Treatment in marathi
“HMPV विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, रुग्णालय अधिष्ठातांनी सज्ज राहणं आवश्यक”; हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा : ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेलटॉसचे धाबे दणाणणार; लवकरच लॉन्च होणार होंडाची ‘ही’ SUV, फीचर्स एकदा पाहाच

टोयोटा Rumion एक्सटेरिअर आणि इंटेरिअर

मारुती बलेनो आणि टोयोटा ग्लांझा प्रमाणेच Rumion या मॉडेलची स्टाइल अर्टिगापेक्षा थोडे वेगळे असेल. टोयोटाच्या या नवीन मॉडेलमध्ये अपडेटेड फॉग लॅम्प हाऊसिंग, इनोव्हा क्रिस्टासारखी ग्रील आणि नवीन ड्युअल टन अलॉय व्हीलसह नवीन बंपर मिळेल. या नवीन मॉडेलच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास Rumion त्याची फीचर्सची यादी Ertiga सह शेअर करते. ७ सीट्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, Apple कार प्लेसह ७ इंचाचा टचस्क्रीन, Arkamys साउंड सिस्टीम आणि सुरक्षेच्या दृष्टीने यात चार एअरबॅग्स, EBD सह ABD आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम आणि सर्व सीट्ससाठी सीट बेल्ट रिमाइंडर्स असे फिचर यामध्ये मिळू शकतात.

इंजिन

Rumion मध्ये अर्टिगाप्रमाणेच १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते. जे १०३ एचपी पॉवर आणि १३७ एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच ते ५-स्पीड किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले असणार आहे. यामध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देखील मिळणार आहे. Rumion पेट्रोलवर २०.५१ किमी प्रतिलिटर आणि सीएनजीवर २६.११ किमी प्रतिकिलो धावू शकते असा टोयोटाचा दावा आहे.

हेही वाचा : २०२५ मध्ये बाजारात येणार Hyundai ची नेक्स्ट जनरेशन Venue, सध्याचे मॉडेल ‘या’ SUV ना देतेय टक्कर

स्पर्धा

Rumion एमपीव्ही लॉन्च झाल्यांनतर मारुती सुझुकी अर्टिगा, मारूती सुझुकी XL6 आणि किआ Carens यांच्याशी स्पर्धा करेल.

Story img Loader