टोयोटाच्या एमपीव्ही कार लाँचची जोरदार चर्चा गेला महिनाभर भारतात सुरू होती. अखेरीस आज त्यावरून पडदा दूर करत कंपनीने Toyota Innova Hycross MPV इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही ही कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली. ही सेल्फ चार्जिंग हायब्रीड इलेक्ट्रिक कार आहे. विशेष म्हणजे सुरू केल्यानंतर पहिल्या अवघ्या 9.5 सेकंदांमध्ये ही कार ताशी १०० किलोमीटर्सचा वेग गाठू शकते. ही कार २०२३ या नवीन वर्षांत, जानेवारी महिन्यापासून उपलब्ध होणार असून तिच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा : फोर्सने सादर केली दमदार URBANIA VAN, जाणून घ्या आसन क्षमता आणि किंमत

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर

हायक्रॉस हे इनोव्हाचे पूर्णपणे नवीन मॉडेल असून तिच्या बांधणीसाठी टोयोटाने प्रथमच मोनोकॉक बांधणी तंत्राचा वापर केला आहे. हायब्रीड म्हणजेच पेट्रोल आणि वीजेवर चालणारे इंजिन हे या मॉडेलचे खास वैशिष्ट्य आहे. प्रति लिटर २१.१ मायलेजचा दावा कंपनीने केला आहे. आजवरच्या इनोव्हाच्या पारंपरिक डिझाईनमध्येही कंपनीने चांगला बदल केला असून आटोपशीर कॉम्पॅक्ट आणि आरामदायी असा तिचा लूक आहे. मुळात तिचे डिझाईन करतानाच ही कुटुंबासाठीची आरामदायी अशी बहुपयोगी कार असावी (एमपीव्ही MPV) असेच डोक्यात होते, तेच लक्ष्य होते, असे टोयोटाचे चीफ इंजिनीअर हिदेकी मिझुमा यांनी या प्रसंगी सांगितले. अशाच प्रकारची कार गेल्या आठवड्यात टोयोटाने इंडोनेशियामध्ये झेनिक्स या नावाने लाँच केली.
बाहेरून या कारचा लूक एसयूव्ही (SUV) सारखा राहील, याची काळजी कंपनीने घेतली आहे. कुटुंबाच्या उपयोगितेमध्ये एमपीव्हीसारखी आणि गाडी चालविण्याचा आनंद मिळण्यासाठी ती एसयूव्हीसारखी असेल याची काळजी घेण्यात आली आहे.

आणखी वाचा : लवकरच लाँच होणार ‘या’ छोट्या कार, बाजारात घालणार धुमाकूळ

हायक्रॉसची लांबी ४,७५५ मिमी. असून रुंदी १,८५० मिमी. आहे. इनोव्हा क्रिस्टापेक्षा लांबी- रुंदी अधिक आहे. व्हीलबेसही १०० मीमीने अधिक आहे. या कारचे इंटिरिअर क्रिस्टापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. ४.२ इंचांचा एमआयडी डिस्प्ले आणि १०.१ इंचांचा फ्लोटिंग टच स्क्रीन हेही या गाडीचे वैशिष्ट्य असून गाडीतील पुढच्या व मागच्या एसीमधील तापमान स्वतंत्रपणे सेट करण्याची सोय देण्यात आली आहे. हायक्रॉसला मोठे पॅनारोमिक सनरूफही देण्यात आले आहे. आतमध्ये जेबीएलचे नऊ स्पिकर्स असलेली साऊंड सिस्टिम देण्यात आली आहे.

आणखी वाचा : प्रतीक्षा संपली! ULTRAVIOLETTE F77 आज होणार लाँच; ३०७ किमी रेंज, ‘ही’ आहे टॉप स्पीड

टोयोटाने या निमित्ताने प्रथमच भारतात एडीएएस ही सुरक्षा प्रणाली हायक्रॉसमध्ये वापरली आहे. या मध्ये लेन कीप असिस्ट, रेअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, प्री- कोलिजन सिस्टिम आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यांचा समावेश करण्यात आला आहे. सायरस मिस्त्री अपघातानंतर सुरक्षा प्रणालीवर सर्वच कंपन्यांनी अधिक भर दिला आहे. याशिवाय सुरक्षेसाठी सहा एअर बॅग्जही देण्यात आल्या आहेत. आठ जण सहज बसून प्रवास करू शकतील, अशी अंतर्गत रचना करण्यात आली आहे. इंधन पूर्ण भरलेले असेल तर २१.१ किलोमीटर्स प्रतिलीटर या क्षमतेने ही कार एक हजार ९७ किलोमीटर्सचा प्रवास करू शकते, अशा कंपनीचा दावा आहे. सध्या केवळ ५० हजार रूपये भरून गाडीचे बुकिंग करता येईल. जानेवारी, २०२३ मध्येच कंपनी गाडीची किंमत जाहीर करणार आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

Story img Loader