Toyota Taisor Offers Accessories : सणासुदीच्या काळात आपल्यातील अनेक जण गाडी घेण्याचा विचार करतात. भारतात सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे ही काही विशेष बाब नाही. अनेक ऑफर आणि सवलतींचा मोह तुम्हाला कार खरेदी करण्यास भाग पाडतो. तर हीच नेमकी बाब लक्षात ठेवून टोयोटाने अर्बन क्रूझर टायसर (Urban Cruiser Taisor) लाँच केली आहे. नवीन लिमिटेड एडिशन टोयोटा टायसरमध्ये २० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ॲक्सेसरीज (Toyota Taisor Offers Accessories) उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गाडीला अधिक आकर्षक बनविण्यासाठी ही चांगली संधी आहे. चला तर या गाडीच्या फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊ…

ऑफर

टोयोटा जेन्युइन ॲक्सेसरीज (TGA) पॅकेज टर्बो पेट्रोल व्हेरियंटसाठी उपलब्ध आहे. याचा अर्थ फक्त टर्बो पेट्रोल गाड्या घेणाऱ्यांना ही खास ऑफर (Toyota Taisor Offers Accessories ) मिळेल. तसेच ही ऑफर ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वैध असेल.

crime branch police inspector shrihari bahirat along with two suspended in bribery case
गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यासह दोघे निलंबित, अटक न करण्यासाठी पाच लाखांची लाच
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
CCTV, Thane district, Thane, Thane latest news,
उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही
Shortage of petrol diesel in Pune Pimpri Chinchwad due to protest of pump owner Pune news
पुणे, पिंपरी-चिंचवडवर इंधन टंचाईचे सावट! पंपचालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल, डिझेलचा तुटवडा
india houses sell declined
विश्लेषण: देशभरात घरांच्या विक्रीला घरघर? मुंबई-पुण्यातही ग्राहक उदासीन?
Ratan Tatas significant investments helped startups to stand on thier own feet
स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?
viral video of sun surprise father
VIRAL VIDEO : ‘बाबांच्या डोळ्यांतला आनंद…’ केक घेऊन दरवाजामागे उभा राहिला अन्… पाहा लेकानं बाबांना कसं दिलं सरप्राईज
Video of a small stall of a milk seller in Ahmednagar is going viral
VIDEO: नगरकरांचा नादच खुळा! आप्पांनी दुधाच्या गाड्यावर लावला असा बॅनर की लोकांची होऊ लागली तुफान गर्दी

फीचर्स

लिमिटेड एडिशन टायसरसह (Toyota Taisor Offers Accessories) उपलब्ध असलेल्या मोफत पॅकेजमुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार कूप SUV कस्टमाइज करण्याचा पर्याय मिळतो. या पॅकेजमध्ये काही महत्त्वाची फीचर्स आहेत. त्यामध्ये ग्रेनाइट ग्रे व रेड कलर्समध्ये फ्रंट व रिअर अंडर स्पॉयलर, डोअर सिल गार्ड्स, हेडलॅम्प्स आणि फ्रंट ग्रिलसाठी क्रोम इन्सर्ट्स, अतिरिक्त साइड बॉडी क्लाडिंग, डोअर व्हिझर, सर्व हवामानासाठी योग्य मॅट्स (ऑल-वेदर मॅट्स) , वेलकम डोअर लॅम्प आदी सर्व फीचर्स गाडीला अधिक आकर्षक बनवितात.

हेही वाचा…Suzuki Gixxer offers : आणखी काय हवं? १० वर्षांची वॉरंटी, तर २० हजार रुपयांपर्यंत…; सुझुकीची बेस्ट डील

इंजिन

लिमिटेड एडिशन टोयोटा टायसरमध्ये एक लिटरचे ३-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ९९ बीएचपी आणि १४८ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्स्मिशनसह जोडले गेले आहे. त्यामुळे ही गाडी चालवायला सोपी आणि आरामदायक होते. दुसरीकडे स्टॅण्डर्ड टायसरला १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन मिळते, जे ८९ बीएचपी आणि ११३ एनएम पॉवर देते. हे ५ स्पीड मॅन्युअल किंवा ५ स्पीड एएमटीसह जोडण्यात आले आहे.

किंमत

लिमिटेड एडिशन Taisor च्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कारण- लिमिटेड एडिशन Taisor ची एक्स-शोरूम किंमत १०.५५ लाख ते १३.०३ लाख रुपयांदरम्यान आहे. ही गाडी टोयोटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती सुझुकी ब्रेझा, फ्रॉन्क्स, टाटा नेक्सॉन, महिंद्रा 3X0, ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट व आगामी स्कोडा कायलाक यांच्याशी स्पर्धा करील.