भारतीय बाजारपेठेतील एक अग्रगण्य कार कंपनी टोयोटाने भारतात आपल्या कॅमरी हायब्रीड लग्जरी सेडान कारचे नवे मॉडेल लॉंच केले आहे. या गाडीची एक्स शो रुम किंमत ४१ लाख ७० हजार इतकी आहे. म्हणजेच या मूळ किंमतीवर कर आणि इतर गोष्टी आकरल्यानंतर गाडीची किंमत ५० लाखांच्या आसपास असू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. या सेगमेंटमध्ये येणाऱ्या ऑडी आणि बीएमडब्ल्यू कार्सना ही कार मजबूत टक्कर देईल. टोयोटा मोटर्सने कॅमेरी हायब्रीड सेडानला पहिल्यांना २०१३मध्ये सादर केले होते. पण देशात बीएस ६ मानक लागू झाल्यानंतर या गाडीच्या अद्ययावत मॉडेलची आतुरतेने वाट बघितली जात होती. जाणून घेऊया टोयोटाच्या कॅमेरी हायब्रीड सेडानमध्ये आपल्याला कोणकोणते नवे फीचर्स मिळणार आहेत.
नव्या कॅमेरी हायब्रीड सेडानमध्ये झाले आहेत बदल
टोयोटा किर्लोस्कर मोटरने नव्या कॅमरीमध्ये काही हलके बदल केले आहेत. यामध्ये नवीन इंफोटेंमेंट सिस्टम, नवीन फ्रंट बम्पर, नवीन ग्रील अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतील.
कॅमरी हायब्रीड सेडानचे एक्सटिरीअर
या सेडान कारमध्ये १७ आणि १८ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. सोबतच नव्या कॅमरीमध्ये डीप मेटल ग्रे रंगसंगती पाहायला मिळेल. याशिवाय एलईडी टेटलाईट्सही अद्ययावत करण्यात आले आहेत. प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सोबतच यामध्ये ९ इंचाचे टचस्क्रिन इंफोटेंमेंट सिस्टम देण्यात आले आहे.
टोयोटा कॅमरी हायब्रीडचे इंजिन
टोयोटाने या सेडान कारमध्ये अडीच लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे जे १७५ एचपीची पॉवर आणि २२१ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करतो. यासोबतच कॅमरीमध्ये ११८ एचपीची पॉवर आणि २०२ एनएमचे टॉर्क जनरेट करणारे १६० केडब्ल्यूचे इलेक्ट्रिक मोटर मिळेल. तसेच यात ७ स्पीड ई-सिव्हीटी गिअरबॉक्स मिळेल.
हेही वाचा : जुने वाहन विकल्यावर तात्काळ बंद करा तुमचं फास्टॅग अकाउंट; अन्यथा बसू शकतो मोठा फटका
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सहाय्यक उपाध्यक्ष अतुल सूद यांनी सांगितले, ‘कॅमरी हायब्रीड ही पॉवर लग्जरीचा एक उत्तम संगम आहे. ग्राहकांना उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्याचे ध्येय लक्षात ठेवून आम्ही ही कार डिझाईन केली आहे. या कारमध्ये वापरण्यात आलेले सेल्फ चार्जिंग हायब्रिड तंत्रज्ञान उच्च कार्यक्षमता गती आणि कमी उत्सर्जनाचे मिश्रण देते.’
अतुल सूद यांनी पुढे सांगितले, ‘मागच्या काही वर्षांमध्ये ग्राहकांनी कॅमरीला पसंती दिली आहे. तसेच कॅमरीचे नवीन फीचर्स ग्राहकांना कारकडे आकर्षित करतील असा कंपनीला विश्वास आहे.’ २०१३पासूनच कॅमरी हायब्रीडने भारतीय बाजारात आपली पकड मजबूत केली आहे. ही कार पेट्रेलवर चालत असून यामध्ये एक मोटर लावण्यात आले आहे जे १६० किलो वॉट पॉवर जनरेट करते. या सेडान कारमध्ये स्पोर्ट, इको आणि नॉर्मल असे तीन ड्राइव्हिंग मोड आहेत.