सध्या वाहनांची मागणी खूप वाढली आहे. स्वस्त ते महागड्या आणि आलिशान वाहनांना बाजारात खूप मागणी आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा लोक शोरूममध्ये कार खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा डीलर्स त्यांना दीर्घ प्रतीक्षा कालावधी देतात. काही कारवर, प्रतीक्षा कालावधी केवळ महिनेच नाही तर वर्षानुवर्षे देखील असतो. कॉम्पॅक्ट SUV ला भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असली तरी, सात सीटर फॅमिली कार देखील विक्रीच्या बाबतीत मागे नाहीत. मार्केटमध्ये काही बजेट ७-सीटर कारची मोठी मागणी आहे. अनेक गाड्यांसाठी लोकांना सहा-सात महिने वाट पाहावी लागते. जर तुम्ही विचार करत असाल की आम्ही मारुती एर्टिगा बद्दल बोलत आहोत तर तसे नाही. ऑगस्ट २०२३ मध्ये, Toyota ने आपली नवीन सात सीटर कार दाखल होती, आता या कारला बाजारपेठेत प्रचंड बुकिंग मिळत आहे. ग्राहकांची प्रचंड मागणी पाहून कंपनीने कारते तात्पुरते बुकींगच बंद केलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या Toyota Rumion MPV वर ३२ आठवड्यांचा म्हणजेच सात महिन्यांपेक्षा जास्त प्रतीक्षा कालावधी आहे. तथापि, रुमिओनचे प्रकार आणि इंजिन यानुसार प्रतीक्षा कालावधी बदलतो. कंपनी रुमियान S, G आणि V या तीन प्रकारांमध्ये विकत आहे. ग्राहकांना कोणत्या प्रकारासाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल ते जाणून घेऊया…
पेट्रोल प्रकारावर सर्वाधिक प्रतीक्षा
Toyota Rumion MPV च्या पेट्रोल प्रकारावर २८-३२ आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. दुसरीकडे, जर तुम्ही त्याचे सीएनजी प्रकार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या असे करणे शक्य नाही कारण जास्त बुकिंगमुळे कंपनीने तात्पुरते नवीन बुकिंग थांबवले आहे.
(हे ही वाचा : Tata Punch आणि Hyundai Exter समोर तगडं आव्हान, Kia ची देशात येतेय लहान SUV कार, पाहा काय असेल खास… )
इंजिन
Toyota Rumion MPV ही मारुती एर्टिगाची रिबॅज केलेली आवृत्ती आहे. कंपनी यामध्ये १.५ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरत आहे. हे इंजिन १०३ bhp पॉवर आणि १३७ Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ६-स्पीड ऑटोमॅटिक आणि ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. रुमियानमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. सीएनजीमध्ये ही कार ८८ बीएचपी पॉवर आणि १२१.५ एनएम टॉर्क जनरेट करते. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे मॅन्युअल पेट्रोल मॉडेल २०.५१ किमी प्रति लीटर मायलेज देते. तर, त्याच्या CNG प्रकाराचे मायलेज २६.११ किमी प्रति किलो आहे.
किंमत
Toyota Rumion MPV नुकतीच रु. १०.२९ लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत १३.६८ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.