Car waiting Period in July Reduced: भारतीय बाजारपेठेत एसयुव्ही कारची मागणी झपाट्याने वाढत चालली आहे. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून त्यामुळे बाजारात या कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. SUV सेंगमेंटमध्ये तुम्हाला १० लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या अशा अनेक SUV आता बाजारपेठेत उपलब्ध आहेत. अशाच एका कारला आता बाजारात ग्राहकांची प्रचंड पसंती मिळत आहे. या कारवरील प्रचंड मागणीमुळे गेल्या महिन्यात वेटींग पिरियड वाढला होता. आता या जुलै महिन्यात या कारवरील वेटींग पिरियड कमी झाला आहे.

जपानी कार निर्माता कंपनी टोयोटा (Toyota) सतत नवनवीन प्रयोग करत असते आणि बाजारपेठेत नवनव्या कार सादर करत असते. टोयोटाने आपली अतिशय लोकप्रिय कार Toyota Urban Cruiser Taisor नुकतीच बाजारपेठेत लाँच केली आहे. Toyota Urban Cruiser Taisor एप्रिल २०२४ मध्ये लाँच करण्यात आली. अर्बन क्रूझर सीरीजमध्ये येणारी ही एसयुव्ही Maruti Fronx चं बॅज इंजिनिअर्ड व्हर्जन आहे. म्हणजे या कारचं मूळ स्वरुप फ्राँक्सची आहे. पण यामध्ये कंपनीने काही मोजके बदल केले आहेत. ताज्या डेटावरून असे दिसून आले आहे की, कंपनीला या कारसाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग प्राप्त होत आहे.

investment in banking sector
बँकिंग समभागांतील तेजीने निर्देशांकांना बळ
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
loksatta readers feedback
लोकमानस: रोजगारविरहित वाढ हे प्रमुख आव्हान!
Shivneri Sunadri News
Shivneri : विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे आता शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’, भरत गोगावलेंची घोषणा
how to identify whale vomit
व्हेल माशाची उलटी कशी ओळखतात? बाजारात कोट्यवधीत विकल्या जाणार्‍या उलटीचा कशासाठी वापर केला जातो?
car accident airbags 2 year gorl died
Car Accident: कारच्या पुढच्या सीटवर चिमुकलीसह बसली होती महिला; अपघात झाला, एअरबॅग उघडली आणि मुलगी दगावली
Tata nexon cng launched
टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी
edible oil companies ignore central government order over price hike
केंद्र सरकारचा आदेश खाद्यतेल कंपन्यांनी धुडकावला ? जाणून घ्या, ग्राहकांवर काय परिणाम होणार

(हे ही वाचा : किंमत ६ लाख, मायलेज २७.०१ किमी; देशातील बाजारात ‘या’ सर्वात लहान SUV ला तुफान मागणी; ३६५ दिवसात ९३ हजार कारची विक्री )

कार डीलरच्या मते, Toyota Urban Cruiser Taisor चा प्रतीक्षा कालावधी जुलै २०२४ मध्ये कमी झाला आहे. जूनमध्ये या कारसाठी दोन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी होता, तर जुलैमध्ये तो कमी होऊन एक महिना झाला आहे. तथापि, कारचा प्रकार, रंग आणि स्थानानुसार प्रतीक्षा कालावधी बदलतो. Toyota Urban Cruiser Taisor ची किंमत ७.७३ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते.

Toyota Urban Cruiser Taisor बद्दल बोलायचे झाले तर ते E, S, S+, G आणि V या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक पाच मोनो-टोन आणि तीन ड्युअल-टोन रंगांमधून निवडू शकतात. पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, यात १.२-लिटर, चार-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन तसेच १.०-लिटर, तीन-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. याशिवाय या कारचे सीएनजी व्हर्जनही उपलब्ध आहे.

सुरक्षेच्या बाबतीत कारमध्ये ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोगाम (ESP), हिल-होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकरेज देखील दिलं गेलं आहे.

कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार Toyota Taisor चं टर्बो पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिअंट २१.५ किमी प्रतिलीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिअंट २०.० किमी प्रतिलीटर इतकं मायलेज देईल. तर याचं सीएनजी व्हेरिअंट सर्वाधिक २८.५ किमी प्रतिकिलो इतकं मायलेज देईल.