भारतात या सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक दमदार पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी एखादी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या सात सीटर कारची चांगली मागणी असताना, टोयोटा एक नवीन ७ सीटर कार आणण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव Toyota Rumion असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मारुती सुझुकी एर्टिगाची री-बॅज केलेली आवृत्ती असेल, जी लुक आणि फीचर्समध्ये एर्टिगासारखीच असेल, परंतु ती अधिक शक्तिशाली असू शकते.
काय असतील फीचर्स ?
टोयोटा रुमियनमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह ७-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल्स, रीअर एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, पार्किंग कॅमेरा आणि मागील पार्किंग सेन्सर्ससह आणखीही फीचर्स दिसून येतील.
(हे ही वाचा : Tata Punch चा खेळ संपणार, देशात येतेय ६ एअरबॅग्सवाली सर्वात स्वस्त लहान SUV कार )
इंजिन आणि पॉवर
टोयोटाच्या आगामी ७ सीटर कार रुमियनच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास यात १.५ लीटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे १०५ पीएस पॉवर आणि १३८ एनएम पिकअप टॉर्क जनरेट करते. या MPV मध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ४ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिसेल. याची संभाव्य किंमत १० लाखांपासून पुढे असू शकते. ही कार सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.