Toyota Toyota Year End Deals Company Launched Special Edition : जपानी ऑटोमोबाईल उत्पादक टोयोटा भारतीय बाजारपेठेत हॅचबॅक ते एसयूव्ही सेग्मेंटपर्यंतची वाहने सादर करते. पण, आता वर्षाच्या अखेरीस (Toyota Year End Deals) कंपनीने तीन कारच्या लिमिटेड एडिशन लाँच केल्या आहेत; ज्यामध्ये ज्यात टोयोटा ग्लान्झा, टेसर व हायरायडरचा समावेश आहे. त्यात तुम्हाला वर्षभराच्या सवलती आणि टोयोटा जेन्युइन ॲक्सेसरीज (TGA) पॅकेजसह देण्यात येणार आहेत. लिमिटेड एडिशन व्यतिरिक्त, कंपनी आपल्या तीन कारवर १ लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करण्याची संधी देखील देत आहे. नुकत्याच सादर केलेल्या फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन्सना मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे जपानी चारचाकी उत्पादक कंपनी स्पेशल लिमिटेड एडिशन लाइनअप वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवणार आहे.
तीन कारच्या लिमिटेड एडिशन लाँच (Toyota Year End Deals) :
टोयोटा स्पेशल लिमिटेड एडिशन ग्लान्झा (Toyota Special Limited Edition Glanza) :
टोयोटा ग्लान्झा ही चारचाकी प्रत्येक रेंजमध्ये उपलब्ध आहे. नवीन ॲक्सेसरीज पॅकेजमध्ये फ्रंट बंपर गार्निश, फेंडर क्रोम फिनिश, अतिरिक्त बंपर कॉर्नर प्रोटेक्टर व रिअर बंपर क्रोम इन्सर्ट देण्यात येणार आहे. त्याशिवाय डोअर व्हिझर्स, ORVMs वर क्रोम गार्निशिंग व 3D फ्लोरमॅट्ससुद्धा दिले जाणार आहेत.
टोयोटो स्पेशल लिमिटेड टेसर (Toyota Special Limited Edition Taisor) :
टोयोटो स्पेशल लिमिटेड टेसर सब २ मीटर एसयूव्ही, लिमिटेड एडिशन टेसर, E, S व S+ या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. परंतु, हा पर्याय सीएनजी ट्रिमवर उपलब्ध नाही. लिमिटेड एडिशन टेसरला ट्विक केलेले हेडलाइट्स, फ्रंट ग्रिल, स्प्रूस-अप बॉडी कव्हर, illuminated डोअर सिल गार्ड, फ्रंट व रिअर बंपर कॉर्नर गार्निश, रूफ एक्स्टेंड स्पॉयलर, केबिन व बूटसाठी, टोयोटा 3D फ्लोअरमॅट्स देण्यात आले आहेत.
टोयोटो स्पेशल लिमिटेड एडिशन हायरायडर (Toyota Special Limited Edition Hyryder) :
स्पेशल एडिशन Hyryder मडफ्लॅप, डोअर व्हिझर, ऑल-वेदर फ्लोअरमॅट्स, फ्रंट व रिअर बंपर गार्निश, हेड लॅम्प गार्निश व हूड एम्बलम यांसारख्या १३ अधिकृत ॲक्सेसरीज या गाडीला दिल्या जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त बॉडी क्लेडिंग, फेंडर गार्निश, रिअर डुअर लीड गार्निश, रूम लॅम्प, डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर व क्रोम-फिनिश डोअर हॅण्डल्स देण्यात येणार आहेत.