Rules for Riding Bike with Leaving Handles: दुचाकी असो वा चारचाकी, रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळावे लागतात. यातील काही नियम वाहन चालविण्याशी संबंधित आहेत, तर काही नियम कागदपत्रांशी संबंधित आहेत. गाडी चालवताना स्टंट करणारे अनेक तरूण आपण पाहिले असतील. गाडीवर हात सोडून गाडी चालवणारे, झोपून गाडी चालवणारे, गाडीच्या सीटवर उभे राहून स्टंट करणाऱ्या तरूणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण वाहतुकीच्या नियमानुसार, हँडल सोडून बाईक चालवल्यास दंड भरावा लागतो का? हँडल सोडून दुचाकी चालवल्यास दंड होऊ शकतो, जाणून घेऊया नियम काय सांगतो…

वाहतुकीच्या नियमानुसार, तुम्ही हँडल सोडून बाईक चालवल्यास तुमचे चलन कापले जाऊ शकते. ट्रॅफिक पोलिसांना जर तुम्ही स्टंट करताना किंवा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना बाईक चालवताना दिसले तर तुम्हाला दंड होऊ शकतो. अशा प्रकारे दुचाकी चालवल्याबद्दल लोकांना हजारो रुपयांची चलन भरावं लागल्याचे दिसून आले आहे. मात्र, असे करणे तुमच्या जीवासाठीही धोकादायक ठरू शकते. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हँडल सोडून दुचाकी चालवणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

(हे ही वाचा : देशात दाखल झालेल्या ‘या’ नव्या बाईकसमोर बुलेटही विसरुन जाल; पण, किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम )

हँडल सोडून दुचाकी चालवण्याचे तोटे

१. तुम्ही हँडल सोडून बाईक चालवल्यास, तुमचे बाइकवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही अपघाताला बळी पडू शकता.

२. अपघात झाल्यास तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते. तुमचा मृत्यूही होऊ शकतो.

३. हँडल सोडून दुचाकी चालवल्यास अपघातात कोणी जखमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

दुचाकी चालवताना कोणती खबरदारी घ्यावी?

१. बाईक चालवताना नेहमी बाईकचे हँडल धरा.

२. दुचाकी चालवताना मोबाईल फोनवर बोलू नका.

३. दुचाकी चालवताना लक्ष केंद्रित करा.

४. तुम्ही थकलेले असाल किंवा दारूच्या नशेत असाल तर दुचाकी चालवणे टाळा.

५. बाईक चालवताना कायम हेल्मेट वापरा. साधे कोणतेही हेल्मेट वापरणे धोक्याचे ठरु शकते, त्यामुळे आपले हेल्मेट आयएसआय मार्क असलेले असेल याकडे लक्ष द्या.

Story img Loader