नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी यासाठी पार्टीचे आयोजन केले जात आहे. पार्टीमध्ये अनेकदा मद्यपान केले जाते, त्यानंतर घरी परतताना गाडी चालवून ड्रिंक अँड ड्राइव्ह नियमांचे उल्लंघन केले जाते. दारू पिऊन गाडी चालवणे स्वतःसह इतरांच्या जीवासाठीही धोकादायक असते. जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला दारू प्यायल्यानंतर गाडी चालवताना पकडले तर किती दंड भरावा लागतो? ड्रिंक अँड ड्राइव्हचे मुंबईत काय नियम आहे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दारू पिऊन गाडी चालवल्याने मुंबईत किती दंड आकारला जातो?
दारू पिऊन गाडी चालवल्याने १०,००० रुपयांचा दंड किंवा ६ महिने कारावास किंवा दोन्ही दंड ठोठावले जाऊ शकतात. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा नियम लागू होतो.

वाहन चालक दारू प्यायला आहे हे कसे तपासले जाते?
ट्रॅफिक पोलिसांकडुन कधीही कोणत्याही वाहन चालकाची तपासणी केली जाऊ शकते. या तपासणी दरम्यान वाहन चालकाला ब्लड अल्कोहोल कंटेंट टेस्ट ब्रेथलायझरच्या मदतीने घेतली जाईल. या टेस्टच्या रिझल्टमध्ये अल्कोहोल कंटेंट ३० एमजी पर १०० एमएल पेक्षा जास्त आले तर याचा अर्थ त्या चालकाने अल्कोहोलचे सेवन केले आहे. नियमाचे उल्लंघन केल्याने चालकावर दंड आकारला जातो.