Triumph Achieves 10,000 Bookings In India Within 10 Days: तरुणांची आवडती बाईक आली आहे. हार्ली डेविडसननं भारतीय बाजारपेठेत आपली पहिली स्वस्त बाईक Harley-Davidson X440 लाँच केली आहे. ही बाईक बुक करायची असल्यास तुम्हाला २५ हजारांची बुकिंग अमाऊंट भरावी लागेल. कंपनीची ही पहिली अशी बाईक आहे जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आलीये. हार्लेने हिरो मोटोकॉर्पच्या सहकार्याने ही बाईक बनवली आहे. ४४० सीसी क्षमतेच्या या गाडीला तीन लाखांहून कमी किंमतीत लाँच केल्यामुळे रॉयल एनफिल्डला ही गाडी चांगलीच टक्कर देणार आहे.
त्याच वेळी, ब्रिटिश ब्रँड ट्रायम्फने बजाज ऑटोच्या सहकार्याने स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400 हे दोन मॉडेल सादर केले. स्पीड 400 ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक आहे. या सर्व बाईक रॉयल एनफिल्डशी स्पर्धा करताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे Triumph Speed 400 आणि Scrambler 400 ला १० दिवसात भारतात १०,००० पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत.
(हे ही वाचा : देशात सर्वाधिक खपली जाणारी टाटाची ७.८० लाखाची कार ९० हजारात न्या घरी, ऑफर जाणून उडतील तुमचे होश)
कंपनीने Harley-Davidson X440 बाईक तीन व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. तिची सुरुवातीची किंमत २.२९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
५ जुलै रोजी भारतात लॉन्चच्या वेळी कंपनीने स्पीड 400 ची किंमत २.२३ लाख रुपये सांगितली होती. ही किंमत सुरुवातीच्या १० हजार ग्राहकांसाठीच होती. यानंतर किंमत २.३३ लाख रुपये होईल. या मोटारसायकली ट्रायम्फ शोरूममध्ये जुलैच्या अखेरीस उपलब्ध होतील. Scrambler 400 ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल आणि लॉन्चच्या वेळी किंमत जाहीर केली जाईल.