दुचाकी क्षेत्रात स्पोर्ट्स बाइक सेगमेंटच्या एंट्री लेव्हल बाइक्सना खूप मागणी आहे. कमी बजेट आणि जलद गतीसह आकर्षक डिझाइन असलेल्या बाइक्सना सर्वाधिक पसंती दिली जाते. जर तुम्हाला कमी किंमतीत स्पोर्ट्स बाईक घ्यायची असेल, तर तुम्ही या सेगमेंटच्या दोन बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या बाइक त्यांच्या स्पीड आणि स्टाईलसाठी पसंत केल्या जातात. स्पोर्ट्स बाईकच्या तुलनेसाठी आमच्याकडे TVS Apache RTR 160 आणि Bajaj Pulsar NS 160 बाइक्स आहेत. तुम्हाला या दोन्ही बाईकच्या किंमतीपासून ते स्पेसिफिकेशनपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.
TVS Apache RTR 160: टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० बाईक ही कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्समध्ये गणली जाते. या बाइक्सचे दोन प्रकार कंपनीने बाजारात लाँच केले आहेत. बाइकमध्ये १५९.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे १५.५३ पीएस पॉवर आणि १३.९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत. तसेच सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाइक ५० किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० बाईकची सुरुवातीची किंमत १.०९ लाख रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर जाताना १.१२ लाख रुपयांपर्यंत जाते.
Hyundai Offers Discount: ह्युंदाई ‘या’ गाड्यांवर देतंय ५० हजार रुपयांपर्यत सूट
Bajaj Pulsar NS 160: ही एक स्टायलिश आणि वेगवान बाईक असून कंपनीने बाजारात फक्त एकाच प्रकारासह लाँच केली आहे. बाइक १६०.३ सीसीस सिंगल सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहे. १७.२ पीएस पॉवर आणि ५-स्पीड ट्रान्समिशनसाठी १४.६ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक्सचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यात सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. मायलेजबद्दल, बजाज ऑटोचा दावा आहे की ही बजाज पल्सर एनएस १६० बाईक ४८ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. बजाज पल्सर एनएस १६० बाइकची सुरुवातीची किंमत १,१९,४१८ रुपये असून ऑन रोड १,४०,८५१ रुपयापर्यंत जाते.