इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत ओला, अथर, बजाजसह टीव्हीएसने देखील आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. टीव्हीएसचे इलेक्ट्रिक वाहन ग्राहकांना किती भुरळ घालत आहे हे तिच्या डिलिव्हरीच्या आकड्यांमधून समजून येते. टीव्हीएसने दिल्लीमध्ये आपल्या नवीन टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कुटरच्या २०० युनिट्सची डिलिव्हरी एका दिवसात केली.
दिल्लीत ई वाहनांचा स्वीकार मोठ्या प्रमाणात होत असल्याने आयक्यूबला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ई वाहनांच्या वाढलेल्या मागणीला नवीन वीज दर आणि प्रगतीशील सरकारी धोरणे देखील कारणीभूत मानली जात आहेत.
टीव्हीएसने शहरात आयक्यूब आणि आयक्यूब एसच्या लॉचपासून २ हजार युनिट्सची डिलिव्हरी केली आहे. यामध्ये मेगा डिलिव्हरी इव्हेंटचा देखील समावेश आहे. या इव्हेंटमध्ये २०० स्कुटर्सची डिलिव्हरी करण्यात आली. स्कुटर्स ग्राहकांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
(इनोव्हामध्ये पहिल्यांदाच मिळणार ‘हे’ जबरदस्त फीचर, तुम्हालाही आवडेल, पाहा फोटो)
TVS iQube and TVS iQube S variants सिंगल चार्जमध्ये १०० किमीची रेंज देतात. आयक्यूब आणि आयक्यूब एस व्हेरिएंटमध्ये ३.४ किलोवॉट हवरचा बॅटरी पॅक मिळतो. स्कुटरमध्ये ७ इंच टीएफटी डिस्प्ले, एचएमआय कंट्रोल्स आणि रिव्हर्स पार्किंग मिळते. सर्वोच्च व्हेरिएंट आयक्यूब एसटीमध्ये ५.१ किलोवॉट हवरचा बॅटरी पॅक मिळतो, जो सिंगल चार्जवर १४० किमीची रेंज देतो. आयक्यूब आणि आयक्यूब एस हे दिल्ली एनसीआरमध्ये अनुक्रमे ९९ हजार १३० आणि १.०४ लाखांमध्ये उपलब्ध आहेत.