TVS Jupiter 125 Disc Finance Plan: स्कूटर खरेदीचा विचार करत असाल तर बाजारात तुमच्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकीच एक ‘TVS Jupiter 125 Disc’ ही स्कूटर आहे. ही स्कूटर कंपनीने अलीकडेच नवीन डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह बाजारात आणली आहे. TVS ज्युपिटर 125 च्या संपूर्ण सोप्या फायनान्स प्लॅनविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला ही स्कूटर अगदी कमी डाउन पेमेंटमध्ये खरेदी करता येऊ शकते.
TVS Jupiter 125 किंमत
आज आम्ही तुम्हाला TVS Jupiter 125 च्या डिस्क ब्रेक वेरिएंटबद्दल सांगत आहोत, जो या स्कूटरचा टॉप व्हेरियंट आहे. दिल्लीमध्ये त्याची एक्स-शोरूम किंमत ८९,६२५ रुपये आहे, जी ऑन-रोड झाल्यानंतर १,०६,७१६ रुपये होते. जर तुम्हाला एक लाख रुपये एकत्र न खर्च करता ही स्कूटर घ्यायची असेल, तर १५ हजार रुपयांचे डाउन पेमेंट करुन ही स्कूटर घरी घेऊन जाण्याची संपूर्ण योजना जाणून घ्या.
(हे ही वाचा: १०० किमी रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर FREE मध्ये बुक करा, टॉप स्पीडही आहे जबरदस्त )
TVS Jupiter 125 फायनान्स प्लॅन
ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, तुमच्याकडे १५,००० रुपये असल्यास, तुम्हाला या स्कूटरसाठी ९१,७१६ रुपयांचे बँक कर्ज मिळू शकते. या कर्जाच्या रकमेवर बँक वार्षिक ७.९७ टक्के व्याज आकारेल.
TVS ज्युपिटर 125 वर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला डाउन पेमेंट म्हणून १५,००० रुपये जमा करावे लागतील, त्यानंतर तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी दरमहा २,९५८ रुपये मासिक EMI जमा करावे लागणार आहे.