Worlds First CNG Scooter: TVS मोटर कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये ज्युपिटर 125 सीएनजीचे प्रदर्शन केले, त्यानंतर त्याच्या लाँच तारखेवर चर्चा सुरू झाली. टीव्हीएसचा दावा आहे की, ही जगातील पहिली फॅक्टरी-फिटेड सीएनजी स्कूटर आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएसच्या या ज्युपिटर 125 सीएनजीमध्ये नवीन काय आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरेल.

इंजिन आणि पॉवर

ज्युपिटर 125 CNG मध्ये 124.8-cc, सिंगल-सिलेंडर आहे. यात 7.2 हॉर्सपॉवरसह एअर-कूल्ड बाय-इंधन इंजिन आहे आणि ते 9.4 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की त्याची कमाल वेग ताशी 80.5 किमी आहे.

Champions Trophy 2025: Indian Team Announced for Champions Trophy
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Hyundai Creta Ev Launch In India, Know Features Details and price
Hyundai Creta EV: अशी SUV भारतात नसेल! ह्युंदाई क्रेटा ईव्ही भारतात लाँच; पाहा किंमत, रेंज आणि फीचर्स डिटेल्स
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
How to choose the best jaggery
भेसळयुक्त गूळ कसा ओळखायचा? यासाठी फॉलो करा ‘या’ तीन टिप्स
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश

पेट्रोल आणि सीएनजी

TVS Jupiter 125 मध्ये CNG सोबत बायोफ्यूएल (Biofuel) पर्याय देखील देण्यात आला आहे. त्यात पेट्रोलसाठी 2-लिटरची टाकी आणि CNG भरण्यासाठी 1.4-किलोचा सिलेंडर आहे. सीटखाली सीएनजी टाकी बसवली आहे. या बाइकमध्ये CNG वरून पेट्रोल मोड बदलण्यासाठी तुम्हाला फक्त एक बटण दाबावे लागेल. यापूर्वी बजाजने बजाज फ्रीडम 125 नावाची सीएनजी बाइक लॉन्च केली होती.

फीचर्स

TVS Jupiter 125 मध्ये LED हेडलाइट, मोबाईल चार्जिंग पोर्ट तसेच ऑल-इन-वन लॉक आणि साइड स्टँड इंडिकेटर यांसारखे फीचर्स आहेत. यामध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलचे फीचर्सही देण्यात आले आहेत.

कधी होणार लॉंच

ज्युपिटर 125 सीएनजीच्या लॉंचची तारीख अद्याप TVS ने जाहीर केलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, TVS ही स्कूटर वर्षाच्या अखेरीस बाजारात आणू शकते. CNG स्कूटर व्यतिरिक्त, TVS ने इथेनॉल-चालित Raider 125, iQube Vision Concept आणि Apache RTSX कॉन्सेप्टदेखील एक्सपोमध्ये अनावरण केली.

Story img Loader