TVS मोटर्सने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर ज्युपिटरच्या ZX मॉडेलची अद्ययावत आवृत्ती लॉन्च केली आहे जी कंपनीने SmartConnect फिचर्ससह अपडेट केली आहे.
या स्कूटरमध्ये संपूर्ण डिजिटल कन्सोल, नेव्हिगेशन आणि व्हॉईस असिस्टंटसह स्मार्ट कनेक्ट सारखे हाय-टेक फीचर्स देण्यात आले आहेत.
नवीन TVS ज्युपिटर ZX मध्ये दिलेल्या स्मार्ट कनेक्ट फिचर्सद्वारे, रायडर्स पूर्ण डिजिटल कन्सोल, व्हॉईस असिस्ट, नेव्हिगेशन असिस्ट, एसएमएस अलर्ट, कॉल अलर्ट इत्यादी फिचर्सचा वापर करू शकतात.
TVS ज्युपिटर ZX ही 110 सीसी सेगमेंटमधील स्कूटरच्या मोठ्या रेंजमधील पहिली स्कूटर बनली आहे ज्यामध्ये कंपनीने व्हॉइस असिस्टंटचे हाय-टेक फिचर्स दिले आहे.
TVS ZX SmartConnect प्लॅटफॉर्म Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल जे TVS Connect च्या मोबाइल अॅपद्वारे कनेक्ट केले जाऊ शकतात.
TVS Jupiter ZX वरील व्हॉईस कमांड फीचरचा वापर ब्लूटूथ हेडफोन्सशी कनेक्ट करून केला जाऊ शकतो जो TVS SmartConnect मोबाइल अॅपशी कनेक्ट केला जाईल.
आणखी वाचा : २३ ते २७ हजारांच्या बजेटमध्ये मिळवा Yamaha Fascino, जाणून घ्या ऑफर
हे अॅप्लिकेशन कनेक्ट केल्यानंतर, तुम्ही तुमच्या TVS Jupiter ZX ला व्हॉइस कमांड देऊ शकाल.
TVS Jupiter ZX च्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, कंपनीने नवीन इंटिग्रेटेड स्टार्ट जनरेटर सिस्टम, एलईडी हेडलॅम्प, 3-लिटर क्षमतेचे ग्लोव्ह बॉक्स, स्मार्टफोन चार्जिंग सॉकेट, 21-लिटर अंडर-सीट स्टोरेज यांसारखी फिचर्स दिली आहेत.
स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे.
TVS Jupiter ZX SmartConnect च्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर कंपनीने यामध्ये 110 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे.
IntelliGo तंत्रज्ञान आणि iTouchstart तंत्रज्ञानाने सुसज्ज, हे इंजिन 5.8 PS पॉवर आणि 8.8 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
TVS Jupiter ZX SmartConnect च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत ८०,७३ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह लॉन्च केली आहे.
TVS Jupiter ZX SmartConnect ने बाजारात प्रवेश केल्यामुळे, ही स्कूटर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह Suzuki Access 125, Yamaha Fascino 125 आणि Aprilia 125 सारख्या प्रीमियम स्कूटरशी थेट स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे.