TVS Jupiter 110 : टिव्हीएस मोटर्सने २०२५ मध्ये त्यांच्या एका टू व्हिलर रेंजला अपडेट करण्यास सुरुवात केली आहे ज्यामध्ये कंपनीने बेस्ट सेलिंग आणि लोकप्रिय स्कूटर टिव्हीएस ज्युपिटर ११० चे अपडेट व्हर्जन लाँच केले आहे ज्याची सुरुवातीची किंमत ७६,६९१ रुपये आहे. यामध्ये चार व्हेरिअंट्स आहे. ड्रम, ड्रम अलॉय, ड्रम SXC आणि डिस्क SXC या व्हेरिअंटमध्ये माक्रेटमध्ये सादर करण्यात आली आहे. Honda Activa नंतर Jupiter ही सर्वात जास्त विक्री होणाऱ्या 110cc स्कूटर पैकी एक आहे.

काय आहे नवीन अपडेट?

लेटेस्ट अपडेटमध्ये, TVS Jupiter ११० मध्ये OBD-2B कंप्लायंट इंजिन मिळतात. यामुळे आउटपुटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. TVS Jupiter ११० मध्ये ११३.३cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जो 6500 rpm वर ७.९ bhp आणि iGo असिस्टशिवाय ५००० rpm वर ९.२ Nm चा पीक टॉर्क आणि फंक्शनबरोबर ९.८ Nm चा पीक टॉर्क देतो. या इंजिनला CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सबरोबर जोडलेला आहे.

उच्च व्हेरियंटमध्ये २२० मिमीच्या पेटल फ्रंट डिस्क ब्रेकसह सुसज्जित आहेत, तर सर्व मॉडेल्समध्ये रिअर ड्रम ब्रेक मानक आहेत. संयुक्त ब्रेकिंग सिस्टमचा वापर सुरू आहे. स्कूटीच्या दोन्ही टोकांना ९०/९०-सेक्शन टायरसह १२ इंच चाकांवर चालते.

टॉप व्हेरिअंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हीटीबरोबर एक रंगीत एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि मॅपमाइइंडिया द्वारा संचालित टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आहे. ही स्कूटर सात रंगाच्या पर्यायासह उपलब्ध आहे ज्यामध्ये डॉन ब्लू मॅट, गॅलेक्टिक कॉपर मॅट, स्टारलाइट ब्लू ग्लॉस, टाइटेनियम ग्रे मॅट, ट्वाइलाइट पर्पल ग्लॉस, मेटियोर रेड ग्लॉस आणि लूनर व्हाइट ग्लॉसचा समावेश आहे.

TVS नुसार मार्च २०२५ संपायच्या पूर्वी पूर्ण पोर्टफोलियो ला OBD-2B मानकांमध्ये रुपांतरीत करण्यात येईल. OBD-2B स्वरुपात TVS वाहन रेंज मध्ये सेन्सर तंत्रज्ञान आणि ऑन बोर्ड क्षमतामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईल.
सेन्सर तंत्रज्ञान आणि ऑन-बोर्ड क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. थ्रॉटल रिस्पॉन्स, एअर-इंधन रेशो, इंजिन तापमान, इंधन पातळी आणि इंजिनचा वेग यावर रिअल-टाइम डेटा गोळा करण्यासाठी सिस्टम सेन्सर वापरले जाणार.

Story img Loader