भारतातील आघाडीची ऑटोमेकर टीव्हीएस मोटर्सने आपली लोकप्रिय स्कूटर Ntorq 125 दोन नवीन थीममध्ये लॉन्च केली आहे. स्पायडर-मॅन आणि थोर सारख्या सुपरहिरो पात्रांवर आधारीत थीम आहे. सुपर स्क्वॉड एडिशनची सुरुवातीची किंमत आहे. रु. ८४,८५० रुपये इतकी आहे. याआधी कंपनीने आयर्न मॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिकाची थीमवर स्कूटर लाँच केली आहे. टीव्हीएसने या दोन्ही स्कूटर रेड-ब्लू आणि ब्लॅक सिल्व्हर कलर थीमसह डिझाइन केल्या आहेत. यातून दोन्ही सुपरहिरो प्रतिबिंबित होतात. स्पायडर-मॅन थीमबद्दल बोलायचे तर, त्याच्या बाजूच्या पॅनल्सवर स्पायडर आणि शरीरावर नेट डेकल शैली असलेली इमेज आहे. दुसरीकडे, थोर एडिशनबद्दल बोलताना, कंपनीने ब्लॅक आणि सिल्व्हर रंग वापरून हॅमरची डिझाइन केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोन्ही स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने १२४.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ९.७ पीएसची पॉवर आणि १०.५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोला, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. या स्कूटरच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, व्हॉईस असिस्ट फीचर, ड्युअल राइड मोड (रेस मोड, स्ट्रीट मोड) सारखे फीचर्स दिले आहेत.

टीव्हीएस मोटर्सचे मार्केटिंग हेड अनिरुद्ध हलदर म्हणाले की, “आम्ही स्पायडर-मॅन आणि थोर थीम लाँच करण्याबद्दल खूप उत्सुक आहोत आणि ही दोन्ही पात्रे खूप लोकप्रिय आहेत. जया स्कूटर्सच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा आणि सुविधा देऊ इच्छितो.” जर तुम्हाला मार्वल सीरिजच्या या दोन्ही स्कूटर घ्यायच्या असतील तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा तुमच्या जवळच्या टीव्हीएस डीलरशीपला भेट देऊन खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs launches spider man and thor themed ntorq 125 rmt