टीव्हीएस (TVS) ही एक लोकप्रिय दुचाकी वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये लन्च करतच असते. टीव्हीएस कंपनीने नुकतीच आपली एक नवीन बाइक बाजारात लॉन्च केली आहे. हे मॉडेल बाजारात लॉन्च होण्यापूर्वी इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. टीव्हीएस कंपनीने आपली बहुप्रतीक्षित अशी Apache RTR 310 ही बाइक लॉन्च केली आहे. Apache RTR 310 हा ब्रँड कंपनीच्या ३१० सीसी या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. जे सध्या टीव्हीएसच्या Apache RR 310 बाइकसह BMW G 310 R, G 310 GS आणि G 310 RR सहित चार मॉडेल्सवर आधारित आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन बाइकच्या किंमतीबद्दल,फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
Apache RTR 310 : डिझाइन
नुकत्याच लॉन्च झालेल्या आरटीआर ३१० बाइकचा लुक RTR रेंजमधील इतर स्ट्रीट फायटर्स बाइक्सपेक्षा वेगळी आहे. RTR 310 बाइक टीव्हीएसच्या इतर लाइनअपमधील इतर मॉडेल्सपेक्षा अधिक आकर्षक दिसते. कंपनीने या बाइकमध्ये एक स्प्लिट-स्टाइल एंगुलर हेडलँप, टँक, ओपन रिअर सबफ्रेम, स्प्लिस सीट्स आणि साइड-स्लंग एग्जॉस्ट असे डिझाइन दिले आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
Apache RTR 310 : फीचर्स
नवीन लॉन्च झालेली अपाचे आरटीआर ३१० बाइक टीव्हीएसच्या लाइनअपमधील अधिक वरचढ ठरते. या बाइकमध्ये क्रूझ कंट्रोल, म्युझिक कंट्रोल, व्हॉइस असिस्ट, पाच रायडींग मोड, क्लायमेट कंट्रोल मोड, शिफ्टर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम सारखे अनेक फीचर्स कंपनीने दिले आहेत. तसेच याच्या फीचर्समध्ये ५ इंचाचा टीएफटी इन्स्ट्रुमेंट पॅनल, ब्लूटूथच्या माध्यमातून स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, ऑल एलईडी लाइट्स, यूएसबी चार्जिंग पोर्ट, आणि इन बिल्ट नेविगेशनचा समावेश आहे. TVS एक व्यापक ६-अक्ष आईएमयू इलेक्ट्रॉनिक्स पॅकेज सादर करत आहे, ज्यामध्ये कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, रेस ट्यून्ड डायनेमिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हीली कंट्रोल, सुपरमोटो एबीएस (स्विचेबल रियर एबीएस) यांसारख्या सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत.
बाइकच्या हार्डवेरबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये १७ इंचाच्या अलॉय व्हील्सवर चालते ज्यात मिशेलिन रोड ५ टायर लावण्यात आले आहेत. ब्रेकसाठी दोन्ही टायर्सवर डिस्क ब्रेक लावण्यात आले आहेत. त्यासोबत डुअल-चॅनल एबीएस देण्यात आले आहे. या बाइकचे इंजिन ६,६५० आरपीएम आणि २८.७ एनएम टॉर्क जनरेट करते. TVS Apache RTR 310 ही दुचाकी १५० किमी प्रतितास या वेगाने धावू शकते. तसेच ० ते ६० हा वेग पकडण्यासाठी या दुचाकीला फक्त २.८१ सेकंदचा कालावधी लागतो, असा दावा कंपनीने केला आहे.
Apache RTR 310 : किंमत
टीव्हीएस कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये आपली नवीन Apache RTR 310 बाइक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाइक २.४३ लाख (एक्सशोरूम) रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत ग्राहकांसाठी लॉन्च केली आहे.