भारतीय दुचाकी बाजारात TVS मोटर कंपनीला महत्त्वाचे स्थान आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कंपनीकडे मोटारसायकल आणि स्कूटरचा चांगला पोर्टफोलिओ आहे, ज्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. TVS च्या दुचाकींना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातील बाजारपेठेतही खूप पसंत केले जाते. यासोबतच आता या कंपनीने व्हेनेझुएलामध्येही प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत व्हेनेझुएलामध्ये व्यवसायासाठी प्रवेश करणारी ही पहिली भारतीय वाहन उत्पादक कंपनी ठरली आहे.

१४ उत्पादने करणार लाँच

TVS मोटर कंपनीने व्हेनेझुएलाच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केली. कंपनी तेथे दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसह १४ उत्पादने लाँच करण्याची योजना आखत आहे. त्यांचा परिचय करून देण्यासाठी, कंपनीने स्थानिक वितरक SERVISUMINISTROS JPG सोबत हातमिळवणी केली आहे. म्हणजेच, व्हेनेझुएलामध्ये ते SERVISUMINISTROS JPG च्या सहकार्याने १४ उत्पादने लाँच करेल, ज्यामध्ये बाईक, स्कूटर आणि तीन-चाकी वाहनांचा समावेश असेल.

Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

(हे ही वाचा : चार महिन्यापूर्वी देशात दाखल झालेल्या मारुतीच्या SUV ला स्वस्तात खरेदी करण्याची हीच उत्तम संधी, मिळतोय तगडा डिस्काउंट )

बाईक आणि स्कूटरची रेंज

कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये प्रीमियम मोटरसायकल समाविष्ट आहेत जसे की RR 310, Apache RTR 200 FI, Apache RTR 160, Apache RTR 200 तसेच TRAK 150, 100 (Sport 100) आणि HLX सारख्या स्पोर्ट कम्युटर बाइक्सचाही समावेश आहे. हे स्पोर्टी स्कूटर NTORQ 125 आणि तीन-चाकी किंग GS आणि किंग कार्गो देखील सादर करेल.

जागतिक बाजारपेठेत उपस्थिती

आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, भारतीय उपखंड, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्व मधील पेक्षा जास्त देशांमध्ये TVS चे अस्तित्व आधीपासूनच आहे. आता ते व्हेनेझुएलाच्या बाजारपेठेतही आपले अस्तित्व निर्माण करेल.