भारतीय बाजारपेठेत दुचाकी वाहनांची मागणी वाढतच चालली आहे. यातच आता सणासुदीचा ऑक्टोबर महिना दुचाकी वाहनांसाठी फार चांगला ठरला आहे. टीव्हीएस मोटर कंपनी आणि बजाज ऑटोसाठी ऑक्टोबर महिना चांगला ठरला आहे. दोघांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. TVS च्या विक्रीत २१ टक्के तर बजाज ऑटोच्या विक्रीत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, जर आपण व्हॉल्यूमबद्दल बोललो तर, टीव्हीएस मोटर कंपनी विक्रीच्या प्रमाणात बजाज ऑटोच्या मागे आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये, बजाज ऑटोने एकूण ४ लाख ७१ हजार १८८ युनिट्सची विक्री केली आहे तर TVS ने ४ लाख ३४ हजार ७१४ युनिट्सची विक्री केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

TVS मोटर कंपनीची एकूण विक्री ऑक्टोबरमध्ये वार्षिक २१ टक्के वाढून ४ लाख ३४ हजार ७१४ युनिट्सवर गेली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये कंपनीची किरकोळ विक्री ३ लाख ६० हजार २८८ युनिट्स होती. TVS मोटर कंपनीने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये दुचाकींची विक्री २२ टक्क्यांनी वाढून ४ लाख २० हजार ६१० युनिट झाली आहे, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत ३ लाख ४४ हजार ६३० युनिट्स होती. देशांतर्गत बाजारपेठेत दुचाकींची विक्री ऑक्टोबरमध्ये २५ टक्क्यांनी वाढून ३४४,९५७ युनिट्सवर पोहोचली, जी ऑक्टोबर २०२२ मध्ये २ लाख ७५ हजार ९३४ युनिट होती.

(हे ही वाचा : दिवाळीला स्वस्तात खरेदी करा ३२kmpl मायलेज देणारी मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कार, किती असेल EMI पाहा )

ऑक्टोबर २०२२ मध्ये मोटरसायकल विक्री १ लाख ६४ हजार ५६८ युनिट्सवरून २३ टक्क्यांनी वाढून २ लाख ०१ हजार ९६५ युनिट्सवर पोहोचली. स्कूटरची विक्री मागील वर्षीच्या याच कालावधीत १ लाख ३५ हजार १९० युनिट्सच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढून १ लाख ६५ हजार १३५ युनिट्सवर गेली आहे.

ऑक्टोबरमध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत १९ टक्क्यांनी वाढ

ऑक्टोबर २०२२ मध्ये बजाज ऑटोची एकूण विक्री वार्षिक १९ टक्क्यांनी वाढून ३ लाख ९५ हजार २३८ युनिट्सवरून ४ लाख ७१ हजार १८८ युनिट्स झाली. बजाज ऑटो लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये डीलर्सना पाठवलेल्या युनिट्सची संख्या ३६ टक्क्यांनी वाढून ३ लाख २९ हजार ६१८ युनिट्स झाली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा २ लाख ४२ हजार ९१७ युनिट्स होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही आजपर्यंतची तिची सर्वाधिक मासिक घाऊक विक्री आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs motor company sold 434714 units in october 2023 with a growth of 21 percent as against 360288 units in october 2022 pdb
Show comments