TVS ही भारतातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी दुचाकी गाड्यांचे उत्पादन करते. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन बाईक्स, स्कूटर लॉन्च करत असते. टीव्हीएस कंपनीने आपला एप्रिल २०२३ मधील सेल्स रिपोर्ट जाहीर केला आहे. तर एप्रिल महिन्यात टीव्हीएसने किती युनिट्सची विक्री केली आहे याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

TVS मोटर कंपनीने एप्रिल २०२३ मध्ये एकूण ३,०६,२२४ युनिट्सची विक्री केली आहे. म्हणजेच ४ टक्क्यांची वाढ कंपनीच्या विक्रीमध्ये झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात २,९५,३०८ युनिट्सची विक्री केली होती. टीव्हीएस कंपनीचा एप्रिल २०२२ मध्ये २,८०,०२२ युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात ५ टक्क्यांनी वाढून २,९४,७८६ युनिट्स इतकी झाली आहे. कंपनीची देशांतर्गत विक्री १,८०,५५३ युनिट्सवरुन २,३२,९५६ युनिट्सपर्यंत वाढली आहेत. असे tvs कंपनीने आपल्या एक निवेदनामध्ये म्हटले आहे.

bajaj housing finance ipo gets bids worth rs 3 25 lakh crore
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ‘आयपीओ’ला विक्रमी ३.२५ कोटींच्या बोली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Hyundai Exter New Variants Launched
Hyundai Exter चे दोन नवे व्हेरिएंटचे लाँच, जाणून घ्या ‘या’ एसयुव्हीचे फीचर्स अन् किंमत
Following Bajaj Housing Fin NBFC IPO
‘बजाज हाऊसिंग फिन’पाठोपाठ अन्य ‘एनबीएफसी’ही सूचिबद्धतेचा मार्ग अनुसरणार!
Namo e Waste Management IPO from today
नमो ई-वेस्ट मॅनेजमेंटचा ‘आयपीओ’ आजपासून
monthly SIP of Rs 250 will be available soon
मासिक २५० रुपयांची ‘एसआयपी’ लवकरच शक्य, सेबीप्रमुख माधबी पुरी बूच यांचा पुनरूच्चार
Dev Plastics Industries Limited,
माझा पोर्टफोलियो : उच्चतम मानके, बहुविध प्रस्तुती
Mumbai, GQG Partners, National Pension System Trust, SBI Life Insurance, Ambuja Cement, Adani Group, stake sale, investment, infrastructure, market capitalization,
‘जीक्यूजी पार्टनर्स’सह इतर गुंतवणूकदारांकडून अंबुजा सिमेंटची ४,२५१ कोटी रुपयांची हिस्सा खरेदी

हेही वाचा : जबरदस्त डिस्काउंटसह लॉन्च झाली Renault Kiger RXT; तगड्या सेफ्टी फीचर्ससह मिळणार…

इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube Electric ची विक्री एप्रिल २०२३ या महिन्यामध्ये ६,२२७ युनिट्स इतकी होती. जी मागील वर्षी याच महिन्यात १,४२० युनिट्सची विक्री झाली होती. निर्यातीबद्दल कंपनीने सांगितले, परदेशामध्ये गेल्या महिन्यात ७१,६६३ युनिट्सची विक्री झाली होती. जे एप्रिल २०२२ मध्ये ९९,४८९ इतकी होती.

TVS iQube इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या प्रत्येक महिन्याला वाढवत आहे.कंपनीने आतापर्यंत १,००,००० लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे. iQube ने AIS156 फेज 2 काही बदल केले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार AIS156 मधील बदल आणि सप्लाय चेनमुळे एप्रिल २०२३ मधील उत्पादन थोडे अडचणीचे झाले.