TVS मोटर्सने आपल्या Apache RTR 160 आणि RTR 180 चे अपडेटेड वर्जन भारतात लॉंच केले आहे. या दोन्ही बाईकमध्ये केलेल्या मोठ्या बदलांमध्ये कंपनीने दोन्ही बाईकचे वजन कमी करून त्यांची पॉवर वाढवली आहे. यामध्ये Apache RTR 160 चे वजन २ किलोने आणि Apache RTR 180 चे वजन १ किलोने कमी करण्यात आले आहे.

किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, TVS Motors ने Apache RTR 180 ची किंमत १ लाख ३० हजार रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवली आहे आणि Apache RTR 160 ची सुरूवातीची किंमत १ लाख १७ हजार रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटमध्ये असताना १ लाख २४ हजारापर्यंत जाते.

Car washing tips these parts should be prevented from water while washing the car
कार धुताना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होईल लाखो रुपयांचं नुकसान! ‘या’ भागांमध्ये पाणी गेलं तर गाडी होईल कायमची खराब
Second Hand Car Maintenance Tips In Marathi
Second Hand Car Tips : सेकंड हॅण्ड कारच्या…
Budget 2025 Prices of Electric vehicles to get cheaper
Budget 2025 : इलेक्ट्रिक वाहनांबाबत निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! अर्थसंकल्पातील निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार ‘हे’ फायदे
New Car Care Tips Just Bought A New Car
Car tips: तुम्हीही नुकतीच नवीन गाडी घेतलीय? या गोष्टी नक्की ठेवा लक्षात, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
News About Honda
Honda : होंडा भारतात सुरु करणार इलेक्ट्रिक बाइकची फॅक्टरी, काय असणार खासियत?
be aware about three scam while filling petrol on petrol pump
Video : पेट्रोल भरताना तुमच्याबरोबर होऊ शकतात हे तीन स्कॅम; पेट्रोल पंपावर या गोष्टींची घ्या काळजी
Convert old car into new upgrade your car by using these tips
वर्षानुवर्षे एकच गाडी वापरून तुम्हाला कंटाळा आला आहे का? मग अगदी स्वस्तात बनवा तुमची कार नवीकोरी, जाणून घ्या ‘या’ टिप्स
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?

आणखी वाचा : SHEMA Electric ने EV India Expo 2022 मध्ये सादर केल्या ३ नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, १३० किमीची रेंज

2022 TVS Apache RTR 160
2022 TVS Apache RTR 160 मध्ये कंपनीने १५९.७ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन बसवले आहे. हे इंजिन १६.०४ PS ची पॉवर आणि १३.८५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. TVS मोटर्सने या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडला आहे.

2022 TVS Apache RTR 160 चे दोन व्हेरिएंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ज्यात पहिला सिंगल डिस्क ब्रेक आणि दुसरा ड्युअल डिस्क ब्रेक व्हेरिएंट आहे. बाईकच्या कमी झालेल्या वजनाबद्दल सांगायचे झाले तर कंपनीने या बाईकचे वजन २ किलोने कमी केले आहे, त्यानंतर तिचे नवीन वजन १३७ किलो (सिंगल डिस्क) आणि १३८ किलो (ड्युअल डिस्क) झाले आहे.

आणखी वाचा : Volkswagen Taigun Anniversary Edition नवीन कलर थीमसह भारतात लॉंच, ११ नवीन फीचर्स मिळतील

2022 TVS Apache RTR 180
2022 TVS Apache RTR मध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर १७७ cc इंजिन दिले आहे. हे इंजिन १७.२ PS पॉवर आणि १५.५ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने या बाईकचे वजन १ किलोने कमी केले आहे, त्यानंतर तिचे वजन १४१ किलोवरून १४० किलोवर आले आहे.

आणखी वाचा : Tata Motors Car Discount September 2022: हॅचबॅकपासून ते SUV पर्यंत, टाटा मोटर्सच्या या गाड्यांवर ४० हजारांपर्यंत सूट

2022 TVS Apache RTR 180 and 2022 TVS Apache RTR 160 Features
टीव्हीएस मोटर्सने या दोन्ही स्पोर्ट्स बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टीव्हीएस कनेक्ट अॅप, तीन रायडिंग मोड (स्पोर्ट, अर्बन आणि रेन) सह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहेत.

याशिवाय व्हॉईस असिस्ट, सेटिंगमधील बदल आणि रायडिंग मोडनुसार एबीएसची पॉवर डिलिव्हरी, गियर पोझिशन इंडिकेटर, नवीन एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प यांसारखी फीचर्स जोडण्यात आली आहेत.

Story img Loader