TVS मोटर कंपनीने SmartXonnect तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले नवीन TVS Jupiter ZX Drum व्हेरिएंट लाँच केले आहे. स्टारलाईट ब्लू आणि ऑलिव्ह गोल्ड या दोन रंगांमध्ये ही स्कूटर येईल. SmartXonnect सह, रायडर्स क्लस्टरमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, व्हॉईस असिस्ट, कॉल आणि एसएमएस अलर्ट यासारख्या वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त, स्कूटरला मोबाईल चार्जर मिळतो, ज्यामुळे प्रवासी चालताना त्यांचे डिव्हाइस चार्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(हे ही वाचा : MG ची इलेक्ट्रिक एसयूव्ही आता नव्या अवतारात; दमदार फीचर्सह मिळेल जबरदस्त रेंज, अन् किमतही कमी )

याला १०९.७ cc सिंगल-सिलेंडर, इंधन इंजेक्टेड, एअर-कूल्ड इंजिन मिळते, जे ७,५०० rpm वर ७.७ bhp आणि ५,५०० rpm वर ८.८ Nm आउटपुट करते. यात CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. ZX ड्रम ब्रेकमध्ये एकत्रित ब्रेकिंग सिस्टम आहे, १३० मिमी ड्रम ब्रेक दोन्ही चाकांवर उपलब्ध आहेत. स्कूटरला पुढील आणि मागील बाजूस १२-इंच ट्यूबलेस टायर मिळतात.

किंमत

नवीन TVS Jupiter 110 ZX Drum SmartXonnect प्रकाराची किंमत रु ८४,४६८ (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी ज्युपिटर ZX डिस्क प्रकारापेक्षा ४,५२० रुपये कमी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs on launched the jupiter zx drum at the starting price of rs 84468 ex showroom pdb
Show comments