TVS Raider iGO variant launched: TVS ने 125cc मोटरसायकलच्या 10 लाख युनिट विक्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी गुरुवारी Raider iGO बाईक लॉंच केली. या बाईकच्या नवीन व्हेरियंटची किंमत ₹ ९८,३८९ (एक्स-शोरूम) रुपये आहे आणि ही बाईक सेगमेंट-फर्स्ट बूस्ट मोड आणि राइड मोडसह येते. Raider iGo मध्ये नवीन ज्युपिटर 110 प्रमाणेच बूस्ट फीचर्स आहेत, जे रेडरला अतिरिक्त 0.55 Nm टॉर्क देते, असा TVS चा दावा आहे.
TVS Raider iGO
स्टार्टर्ससाठी रेडर iGo मध्ये एक नवीन “बूस्ट मोड” आहे, जो iGO असिस्ट टेक्नॉलॉजीमुळे सक्षम झाला आहे. यामुळे Raider रेंजच्या इतर गाड्यांच्या तुलनेत 0.55 Nm इतका अतिरिक्त टॉर्क या गाडीला मिळतो. Raider iGo 11.4 bhp आणि 11.75 Nm पीक टॉर्क आउटपूट देते.
रेडर iGO मध्ये एक नवीन बूस्ट मोड आहे, जो 0.55 Nm टॉर्क बूस्ट करतो. iGO असिस्टसह, Raider च्या या व्हेरियंटमध्ये गाडी 0 ते 60 किमी/तास गती 5.8 सेकंदात वाढवू शकते. तसेच, iGO टेकमध्ये स्टार्ट/स्टॉप सिस्टमदेखील समाविष्ट आहे, जी कार्यक्षमता 10% वाढवण्याचा दावा करते. जरी Raider iGO दिसायला इतर व्हेरियंटप्रमाणेच असली, तरी या व्हेरियंटमध्ये न्यू नर्डो ग्रे कलर स्किम आहे, ज्यामध्ये आकर्षक रेड स्पोर्टी अलॉय व्हिल्स आहेत.
TVS Raider iGO Features
रेडर iGO मध्ये एक पूर्ण डिजिटल रिव्हर्स LCD इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, ज्यामध्ये TV चा SmartXonnect टेक्नॉलॉजी समाविष्ट आहे, ज्यात 85 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्स आहेत. ऑफरवरील इतर सुविधांमध्ये LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स, USB चार्जिंग पोर्ट आणि ब्लूटूथ जोडलेले फीचर्स, जसे की व्हॉइस असिस्ट, मल्टिपल राईड मोड्स आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन समाविष्ट आहेत.
हेही वाचा… चर्चा तर होणारच! ‘या’ स्वस्त एसयूव्हीवर अख्खा देश फिदा, एअरबॅग्जसह आहेत ‘हे’ दमदार सेफ्टी फिचर्स
TVS Raider iGO ला 124.8 cc एयर/ऑइल-कूल्ड 3V इंजिन पॉवर देते, जे 7,500 rpm वर 11.22 bhp आणि 6,000 rpm वर 11.75 Nm टॉर्क निर्माण करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. सस्पेन्शनचे काम गॅस चार्ज्ड 5-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेन्शन आणि टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन करते.