TVS RONIN:  टीव्हीएस मोटरने भारतात त्यांच्या प्रीमियम बाइक RONIN ची २०२५ एडिशन लाँच केली आहे. नवीन एडिशनमध्ये नवीन रंग आणि ग्राफिक्स दिसून येतात. आता ती लूकच्या बाबतीत अधिक प्रीमियम दिसते. ही बाईक थेट रॉयल एनफील्ड हंटर ३५० शी स्पर्धा करेल. टीव्हीएस रोनिन ही एक अत्यंत आरामदायी राईड आहे. टीव्हीएस रोनिन ही एक अत्यंत आरामदायी राईड आहे. दैनंदिन वापरासाठी तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही एक चांगली बाईक आहे. नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला कोणत्या खास आणि नवीन गोष्टी पाहायला मिळतील ते जाणून घेऊ या…

किंमत आणि रंग

नवीन टीव्हीएस रोनिन २०२५ आवृत्तीची (एक्स-शोरूम) किंमत १.५९ लाख रुपये आहे. या ही बाईकमध्ये ग्लेशियर सिल्व्हर, चारकोल एम्बर आणि मिडनाईट ब्लू कलर उपलब्ध आहेत. बाईकच्या डिझाइन आणि इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही बाईक दिसायला छान आहे आणि तरुणांना तसेच कुटुंब वर्गालाही आवडेल. या बाईकमध्ये टी-आकाराचे एलईडी डीआरएल, एलईडी हेडलॅम्प, २ रायडिंग मोड, अॅडजस्टेबल लीव्हर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एलसीडी स्पीडोमीटर आहे.

इंजिन आणि पॉवर

बाइकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बाईकमध्ये २२५.९ सीसी इंजिन आहे जे २०.४ पीएस पॉवर आणि १९.९३ एनएम टॉर्क जनरेट करते. यात ५ स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. बाईकचे इंजिन स्मूद आहे आणि सर्व हवामानात ती चांगले काम करते.

खरी स्पर्धा हंटर ३५० शी असे

टीव्हीएस रोनिन २२५ ची खरी स्पर्धा रॉयल एनफिल्ड हंटरशी असेल. हंटर ३५० ची किंमत १,४९,९०० रुपयांपासून सुरू होते. ही बाईक डिझाइनच्या बाबतीत खूपच चांगली आहे आणि हा तिचा प्लस पॉइंट आहे. हंटर ३५० मध्ये ३४९ सीसी सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे जे २०.२ बीएचपी आणि २७ एनएम टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड गिअरबॉक्स देखील आहे. बाईकचे कर्ब वजन १८१ किलो आहे. हंटर ३५० ही एक दमदार बाईक आहे जी शहरात आणि हायवेवर चांगली चालते. टीव्हीएस रोनिनची हाताळणी आणि राइड गुणवत्ता हंटरपेक्षा खूपच चांगली आहे. कमी वजनामुळे, गाडीला बॅलन्स करणे खूप सोयीस्कर आहे. ही एक चांगली बाईक आहे.

Story img Loader