TVS ही एक लोकप्रिय टू-व्हिलर कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करतच असते. ज्यात नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स ग्राहकांना कंपनी देत असते. या महिन्याच्या शेवटी TVS कंपनी आपले नवीन प्रॉडक्ट सादर करण्याची तयारी करत आहे. नवीन प्रॉडक्ट हे इलेक्ट्रिक टू-व्हीलर असू शकते. जे टीव्हीएसच्या Creon इलेक्ट्रिक स्कूटर या प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची अपेक्षा आहे. टीव्हीएस ने २०१८ च्या ऑटो एक्सपोमध्ये Creon या कन्सेप्ट व्हर्जनची आवृत्ती सादर केली. तामिळनाडूच्या कृष्णिगिरी जिल्ह्यातील हौसूरच्या बाईक निर्मात्या कंपनीने नुकतेच इंटरनेटवर आपल्या अपकमिंग मॉडेलचा टीझर लॉन्च केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२३ ऑगस्ट २०२३ रोजी दुबई येथे होणाऱ्या मीडिया इव्हेंटमध्ये पदार्पणाच्या काही आठवड्यांपूर्वी, TVS ने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक टू-व्हिलरचा टीझर सादर केला आहे. या टीझरमध्ये अपकमिंग ई-स्कूटरचे एप्रॉन (apron), हेडलाइट, इंडिकेटरसह फ्रंट फॅशियाचे डिझाइन दिसून येत आहे. तथापि, टिझरमध्ये हेडलाइट युनिट अस्पष्टपणे दिसत असले तरी असा अंदाज लावला जाऊ शकतो की , आगामी ई-टू-व्हीलर काही प्रमाणात क्रेऑन ई-स्कूटरच्या संकल्पना व्हर्जनशी मिळतीजुळती असेल. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले,Tata ने नव्या अवतारामध्ये लॉन्च केली ‘ही’ कार; किंमत फक्त…

Creon ई-स्कूटरचे जे कन्सेप्ट व्हर्जन पहिल्यांदा प्रदर्शित केले गेले होते. त्यामध्ये ट्वीन स्पार बीम फ्रेम देण्यात आली होती. आणि कन्सेप्ट व्हर्जनचे डिझाईन हे स्पोर्टी होते. यामध्ये ११.७६ kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली होती. कंपनीचे हा दावा आहे की ई-स्कूटर ५.१ सेकंदांमध्ये ० ते ६० किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते. अलीकडच्या काळामध्ये आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये हा दावा केला जात आहे की आगामी काळात येणारे इलेक्ट्रिक स्कूटर TVS Ntorq 125 सारखी असू शकते. नावाबद्दल सांगितले जात आहे की TVS च्या नवीन ई-स्कूटरचे नाव ‘Entorq’ असू शकते. असेही म्हटले जात आहे की TVS लाइनअप iQube मॉडेलच्यावर असू शकते. TVS iQube ही एक अतिशय साधी दिसणारी स्कूटर आहे तर कंपनीची आगामी इलेक्ट्रिक टू-व्हीलर iQube मॉडेल सारखीच असेल.

कामगिरीच्या बाबतीत आगामी स्कूटर ही iQube पेक्षा चांगली असेल असे सांगितले जात आहे. लॉन्च झाल्यानंतर TVS ची ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या Ather 450X, Ola S1 Pro आणि Hero Vida V1 सारख्या प्रीमियम EV ला टक्कर देईल. मात्र बाजारामध्ये लॉन्च झाल्यानंतर टीव्हीएसच्या या आगामी ई-स्कूटरबाबत अधिक माहिती समोर येईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs teaser upcoming eletric scooter launch to this month end related creon tmb 01
Show comments