सध्या ऑटो क्षेत्रात स्कूटर्सची मागणी वाढत चालली आहे. ग्राहकांची मागणी पाहता वाहन उत्पादक कंपन्या देखील खास अपडेटेड फीचर्स असलेल्या स्कूटर्स सातत्याने बाजारात लाँच करत आहेत. तुम्ही देखील स्कूटर खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण TVS कंपनी खास आपल्या ग्राहकांसाठी लोकप्रिय स्कूटर नव्या रुपात लाँच करणार आहे.

देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक TVS मोटर आपली सर्वात लोकप्रिय स्कूटर ज्युपिटरचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. सूत्रानुसार, या नवीन मॉडेलमध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. इतकंच नाही तर आता तुम्हाला यात काही नवीन फीचर्सही पाहता येणार आहेत. सध्या या स्कूटरमध्ये ११०cc आणि १२५cc इंजिन आहेत. सध्या फक्त ज्युपिटर ११० अपडेट केले जात आहे. या स्कूटरमध्ये काय नवीन आणि खास असेल जाणून घेऊया…

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

प्रगत वैशिष्ट्यांसह डिझाइनमधील नावीन्य

नवीन ज्युपिटर ११० च्या डिझाइनमध्ये नवीनता असणार आहे. तुम्हाला त्याच्या फ्रंट लूकमध्ये एक नवीन एलईडी हेडलाइट दिसणार आहे. याशिवाय स्कूटरच्या मागील लूकमध्ये नवीन एलईडी टेललाइट देखील दिसणार आहे. एवढेच नाही तर रायडरसाठी एक लांब आणि मऊ सीट देखील दिसू शकते.

नवीन मॉडेलमध्ये एलसीडी डिस्प्ले असेल जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असेल. याशिवाय त्यामध्ये नेव्हिगेशनची सुविधाही मिळणार आहे. सध्याच्या मॉडेलची किंमत ७३ हजार रुपयांपासून सुरू होते, परंतु नवीन स्कूटरची किंमत ५ हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, असे मानले जात आहे.

(हे ही वाचा : देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी )

नवीन ज्युपिटर ११० ची वैशिष्ट्ये

कॉम्बी ब्रेक
एलसीडी डिस्प्ले
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी
टर्न नेव्हिगेशन
रुंद लांब आसन
ड्रम ब्रेक
21/13 इंच टायर

इंजिन आणि पॉवर

TVS ज्युपिटरमध्ये १०९.७cc इंजिन आहे जे ७.४ bhp आणि ८.४ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन CVT गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ही स्कूटर इको आणि पॉवर मोडसह येते. कंपनीने या स्कूटरवर एकूण १७ कलर ऑप्शन्स दिले आहेत. या स्कूटरचे इंजिन खूपच चांगले मानले जाते.

TVS ज्युपिटर 125 मध्ये अपडेट्स असतील का?

जसे की आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते की, कंपनीचा ज्युपिटर 125 अपडेट करण्याचा सध्या कोणताही इरादा नाही, परंतु सूत्रानुसार, कंपनी दोन्ही स्कूटर एकत्र लॉन्च करू शकते. सध्या १२५cc इंजिन असलेली ही स्कूटर खूप पसंत केली जात आहे. या स्कूटरमध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे इतर स्कूटरमध्ये दिसत नाहीत १२४.८cc इंजिन आहे, जे ८.३PS पॉवर आणि १०.५Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये Eco thrust fuel injection (ETFi) तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे चांगले मायलेज मिळवण्यास मदत करते.

यात ३२ लीटरचे अंडर सीट स्टोरेज आहे ज्यामुळे तुम्ही येथे २ फुल फेस हेल्मेट ठेवू शकता. एवढी जागा तुम्हाला इतर कोणत्याही स्कूटरमध्ये दिसणार नाही. या स्कूटरमध्ये ॲनालॉगसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, या स्कूटरची एक्स-शो रूम किंमत ८३ हजार रुपयांपासून सुरू होते.