गाव असो वा शहर, श्रीमंत असो की गरीब, लोकं गर्दीच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी सहसा दुचाकी वाहनांचा वापर करतात. हल्ली मोठ्या संख्येने लोक दुचाकीचा वापर करतात. पैसे वाचवण्यासाठी लोक आता सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईकचे पर्याय तपासत आहेत. आज आपण एका अशा बाईकबद्दल बोलणार आहोत, जी उत्कृष्ट मायलेज तर देतेच परंतु अनेक वर्षांपासून तिने भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करत आहात? मात्र तुम्हाला जास्त खर्चही नकोय आणि जास्त मायलेज हवंय, अशी तुमची इच्छा असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मायलेज असावं तर असं

आज आम्ही ज्या बाईकबद्दल बोलत आहोत त्या बाईकचे नाव TVS XL100 आहे. खरं तर, TVS XL 100 ही मोपेड सारखी दिसणारी आहे, परंतु शहरी सवारीसाठी ही एक उत्कृष्ट आणि किफायतशीर राइड आहे. शिवाय, तुम्ही त्यात सामान लोड करू शकता आणि सहज वाहून नेऊ शकता.

(हे ही वाचा : ५.९९ लाखाच्या ६ एअरबॅग्सवाल्या सर्वात लहान अन् सुरक्षित SUV वर अख्खा देश फिदा, Punch ही पडतेय फिकी? )

फीचर्स , इंजिन आणि मायलेज

TVS XL 100 मध्ये कंपनी तुम्हाला ९९.७ cc पेट्रोल इंजिन देते. हे इंजिन ४.४ बीएचपी पॉवर जनरेट करते. त्याचा टॉर्क सुमारे ६.५ Nm आहे. त्याच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर, ते खूपच हलके आहे आणि कर्बचे वजन ८९ किलो आहे. त्याचवेळी, त्याचे मायलेज कोणत्याही मोटरसायकलपेक्षा जास्त आहे. हे तुम्हाला प्रति लिटर पेट्रोलवर ८० किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देते. बाईकमध्ये किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

किंमतही कमी

TVS XL 100 तुम्हाला ६ प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आला आहे. तर त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला बाईकचा टॉप व्हेरिएंट ५९,६९५ च्या एक्स-शोरूम किमतीत मिळेल. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त बाइक्सपैकी ही एक आहे. TVS XL100 आता एकूण पाच रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.