भारतीय लोकं प्रवासासाठी दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंती देतात. त्यामुळे देशात दर महिन्याला मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होत असते. कम्युटर बाइक्सनाही मोठी मागणी असून त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पॉवरफुल इंजिनवाल्या, स्पोर्ट्स, क्रूझर आणि रेट्रो बाइक्सना देखील चांगली डिमांड पाहायला मिळत आहे. सणासुदीचा हंगाम सुरू असताना वाहन बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. यातच आता एका बाईकने सणासुदीच्या हंगामात भारतीय बाजारात धुमाकूळ घातला आहे. या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.
Hero MotoCorp ने ऑक्टोबर २०२३ मध्ये दुचाकी विक्रीत आघाडी घेतली. ५ लाख ५९ हजार ७६६ युनिट्सची विक्री झाली आहे, तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४ लाख ४२ हजार ८२५ युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच त्याच्या विक्रीत २६.४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. हिरोच्या निर्यातीतही २८.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुचाकींच्या बाजारात Hero Motocorp कंपनीचा दबदबा आहे. या कंपनीच्या बाईकची बाजारपेठेत सर्वात जास्त विक्री झाली आहे.
(हे ही वाचा: टाटाच्या ‘या’ स्वस्त कारकडे ग्राहकांनी फिरविली पाठ? मायलेज २६ किमी, किंमत फक्त…)
होंडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याची विक्री ४ लाख ६२ हजार ७४७ युनिट्स होती. गेल्या महिन्यात, जपानी दुचाकी उत्पादक कंपनीने वर्ष-दर-वर्ष ८.६ टक्के वाढ नोंदवली कारण ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याची विक्री ४ लाख २५ हजार ९९२ युनिट्सवर होती. होंडाच्या निर्यातीत २८.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये तिसरी सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी निर्माता TVS होती. या कंपनीने ३ लाख ४४ हजार ९५७ युनिट्सची विक्री केली आहे, जी वार्षिक आधारावर २५ टक्के वाढ आहे. TVS ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये (२०२२) देशांतर्गत बाजारात २ लाख ७५ हजार ९३४ युनिट्सची विक्री केली होती. त्याची निर्यात १०.१ टक्क्यांनी वाढली आहे.
बजाज चौथ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये २ लाख ७४ हजार ९११ युनिट्सची विक्री झाली आहे तर ऑक्टोबर २०२२ मध्ये २ लाख ०६ हजार १३१ युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजेच वार्षिक आधारावर विक्रीत ३३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. बजाजने १ लाख २९ हजार ६५८ युनिट्सची निर्यातही केली आहे.
तर सुझुकी विक्रीच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये ६९ हजार ६३४ युनिट्सची विक्री केली, ज्याने गेल्या महिन्यात २१ टक्के वार्षिक वाढ नोंदवली. निर्यातीच्या बाबतीत, सुझुकीने गेल्या महिन्यात १६ हजार २०५ युनिट्सची निर्यात केली.