रॉयल एनफील्ड कंपनीच्या बाइक्सचा भारतात एक मोठा चाहतावर्ग आहे. या बाईकचा लूक, तिचे फीचर्स आणि मजबूत बांधणी लोकांना खूप आकर्षित करत आहे. रॉयल एनफिल्डचे नाव समोर येताच सर्वात पहिले चित्र डोळ्यासमोर येते ते म्हणजे बुलेट. बुलेटने लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे अनेक दशकांपासून भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या काळात रॉयल एनफिल्डने बुलेटला अनेक वेळा अपडेट केले. मात्र, कंपनीने यापलीकडे जाऊन आणखी अनेक उत्पादने बाजारात आणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा परिस्थितीत रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल ही बुलेट आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. वास्तविक, नोव्हेंबर महिन्यात रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल क्लासिक ३५० होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये Royal Enfield Classic 350 च्या एकूण ३०,२६४ युनिट्सची विक्री झाली आहे, जी नोव्हेंबर २०२२ मधील २६,७०२ युनिट्सच्या विक्रीपेक्षा १३.३४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या विक्रीच्या आकड्यासह, देशातील टॉप-१० सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सच्या यादीत ती ९व्या क्रमांकावर आहे.

(हे ही वाचा: नाद करायचा नाय! बाकी कंपन्यांची झोप उडणार, पुढल्या वर्षी दाखल होताहेत ‘या’ ४ स्वस्त कार; एका कारची बुकींगही सुरु)

Royal Enfield Classic 350 ची किंमत १.९३ लाख ते २.२४ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. यात सिंगल चॅनल एबीएस आणि ड्युअल चॅनल एबीएसचा पर्याय आहे. बाईकमध्ये ३५० सीसी सिंगल सिलेंडर ४-स्ट्रोक एअर-कूल्ड इंजिन आहे. बाईकचे वजन १९५ किलो आहे.

यात १३ लिटर इंधन टाकीची क्षमता आहे. त्याचे प्रमाणित मायलेज ३६.२ किलोमीटर प्रति लिटर आहे. बाईकमध्ये अॅनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजिटल ओडोमीटर, नेव्हिगेशन, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, लो फ्युएल इंडिकेटर, पास स्विच, इंजिन किल स्विच, बल्ब टाईप टर्न सिग्नल लॅम्प आणि हॅलोजन हेडलाइट आहेत.

Classic 350 मध्ये कंपनीने पाइलेट लॅम्प सोबत नवीन हेडलँम्प, अपडेटेड फ्युल टँक ग्राफिक्स, नवीन डिझाइनचे एग्जॉस्ट आणि नवीन टेल लाइट दिले आहे. याशिवाय, या बाईकमध्ये जास्त रुंद आणि आरामदायक सीट दिले आहे. जे चालक सोबत मागे बसणाऱ्या व्यक्तीला कम्फर्ट लाइड देते. अन्य खास फीचर्स म्हणून या बाईकमध्ये इंटिग्रेटेड इग्निशन आणि स्टीयरिंग लॉक, LCD इंफो पॅनल सोबत सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि USB चार्जर दिले आहे. याशिवाय, या बाईकमध्ये ब्लूटूथ बेस्ड ट्रिपर नेव्हिगेशन दिले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two wheeler sales november 2023 royal enfield classic 350 becomes best selling bike in november 2023 pdb
Show comments