देशात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅप हे मॅसेजिंग अॅप वापरले जाते. नुकतंच व्हॉट्सअॅपवर पेमेंट पर्याय सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर आता उबेर आणि व्हॉट्सअॅपने भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. उबेरने व्हॉट्सअॅपशी करार केला आहे. त्यामुळे ग्राहक आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उबेर कॅब बुक करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅप बिझनेस प्लॅटफॉर्मवर हे फिचर तयार करण्यात आला आहे. उबेर प्रायोगिक तत्त्वावर लखनऊमध्ये अमलबजावणी करणार आहे. त्यानंतर इतर शहरांमध्ये विस्तार केला जाणार आहे. या फिचरच्या माध्यमातून ग्राहक उबेर कार, उबेर मोटो आणि ऑटो बुक करू शकतील. गाडी बुक करण्याचा पर्याय व्हॉट्सअॅपवर मिळणार असल्याने उबेर अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. कॅब बुक केल्यापासून इच्छित ठिकाणी जाईपर्यंतच्या सर्व क्रिया व्हॉट्सअॅपमधून पार पडणार आहेत. सध्या राइड बुक करण्याचा पर्याय फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. इतर भाषांमध्येही लवकरच हा पर्याय मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा