Types Of Underbody Coating : अंडरबॉडी कोटिंग (Underbody coating) ही एक कार केअर प्रोटेक्टर्सपैकी एक आहे. पण, प्रत्येक वाहनाची crucial components आणि दीर्घ कालावधीसाठी वाहनाचे स्ट्रक्चरल इंटेग्रिटी हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी वाहनाच्या खालच्या बाजूस एक संरक्षक थर लावला जातो, जो ओलावा, मोडतोड, गंज आणि इतर बाह्य नुकसानांपासून वाहनाचे संरक्षण करतो. तर या लेखात आपण अंडरबॉडी कोटिंगचे फायदे आणि त्याचे प्रकार आणि जाणून घेणार आहोत.

अंडरबॉडी कोटिंगचे फायदे (Benefits Of Underbody Coating)

१. बाह्य नुकसानांपासून संरक्षण :

Follow the tips to look like an old car as shiny like a new car
जुनी कार नव्यासारखी चकचकीत दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
Dhananjay Munde on Anjali Damania
Maharashtra Breaking News Updates : “मुलीला तिचे मित्र-मैत्रिणी काय म्हणत असतील?” आरोप होत असताना धनंजय मुंडे भावनिक!
Us president donald trump immigration orders impact on Indian
आपण सारेच ‘भय्ये’?
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

अंडरबॉडी कोटिंगचा प्राथमिक फायदा म्हणजे वाहनाचे गंज आणि इतर पर्यावरणीय हानीपासून संरक्षण करणे. रोड सॉल्ट (Road salt) आणि ओलावा ही गाडीला गंज लागण्याची प्रमुख कारणे आहेत. अंडरबॉडी कोटिंग यांपासून गाडीचे संरक्षण करते.

२. आवाज कमी करणे :

अंडरबॉडी कोटिंगचे आपले वाहन जास्त काळ साथ देईल असे अनेक फायदे आहेत. वाहनाचा रस्त्यावरून जातानाचा आवाज आणि कंपन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कारमालकासह गाडीतील इतर प्रवासी शांतपणे अधिक आरामदायी प्रवास करू शकतात. अंडरबॉडी कोटिंग ध्वनी डॅम्पनर म्हणून कार्य करते आणि वाहनाचा बाहेरील आवाज शोषून घेते.

३. वाहनाच्या पुनर्विक्री मूल्या वाढ :

खरेदीदार कार खरेदी करतो तेव्हा सुस्थितीतील वाहन ही आकर्षक घटकांपैकी एक बाब असते. त्यामुळे अंडरबॉडी कोटिंगसह असलेली कार हा खरेदीदारांसाठी अधिक आकर्षणाचा मुद्दा ठरू शकतो. त्यामुळे वाहनाची किंमत वाढू शकते.

आता अंडरबॉडी कोटिंगच्या प्रकारांबद्दल (Types Of Underbody Coating) जाणून घेऊ…

बाजारात अनेक प्रकारचे अंडरबॉडी कोटिंग्स (Underbody Coating) उपलब्ध आहेत आणि प्रत्येक कोटिंगचे स्वतःचे फायदे, महत्त्व आहे. कारमालक त्यांच्या गरजांनुसार अंडरबॉडी कोटिंगपैकी कोणताही एक प्रकार निवडू शकतात.

१. वॅक्स-बेस कोटिंग्स

वॅक्स-बेस कोटिंग्स अनेक कोटमध्ये (लेयर) लावले जाते. त्यामुळे वाहनाचे इतर अंडरबॉडी कोटिंगप्रमाणेच ओलावा, गंज आणि इतर बाह्य नुकसानांपासून चांगले संरक्षण होते. इतर कोटिंगच्या तुलनेत हे कटिंग स्वस्त आहे.

२. रबर-बेस कोटिंग्स

रबर-बेस कोटिंग्स वाहनांना जाड; पण अधिक टिकाऊ संरक्षण प्रदान करतात. हे कोटिंग्स रसायने आणि घर्षणापासून वाहनाचे संरक्षण करतात, ज्यामुळे हवामान किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात येणाऱ्या वाहनांसाठी योग्य ठरू शकतात.

३. स्प्रे-ऑन लाइनर्स

स्प्रे-ऑन लायनर्स, ॲस्फाल्ट अंडरबॉडी कोटिंग म्हणून ओळखले जाते, या प्रकारचे कोटिंग जाड, टेक्श्चर लेयर म्हणून लागू केले जाते आणि दगड, ओरखड्यांपासून वाहनाचे संरक्षण होते. ते सामान्यतः बस, व्हॅन, ट्रक इत्यादींवर वापरले जातात.

४. पॉलीयुरेथेन कोटिंग्स

या प्रकारातील कोटिंग धातूच्या पृष्ठभागांना चांगले चिकटते. पॉलीयुरेथेन कोटिंग वाहनाचे ओरखडे आणि रसायनांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

गाडीला अंडरबॉडी कोटिंग कधी लावायचे?

कार नवीन असताना काही महिने किंवा वर्षांनंतर अंडरबॉडी कोटिंग लावून घ्यावे.

तसेच वर नमूद केलेल्या ‘अंडरबॉडी कोटिंगचे फायदे वापरून कारमालक त्याच्या वाहनाचे संरक्षणदेखील करू शकतो, असे द डिटेलिंग माफियाचे सीईओ कुणाल सेठी म्हणाले.

देखभाल आणि तपासणी

कारच्या खालच्या बाजूची नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे. जर मालकाला कोटिंगमध्ये नुकसान किंवा झीज झाल्याची चिन्हे दिसली, तर ती त्वरित दुरुस्त करून घ्यावी किंवा पुन्हा लावून घ्यावी. त्याशिवाय कारच्या खालची बाजू नियमितपणे धुणे आणि खोल पाण्यातून वाहन चालवणे टाळावे. या लहान महत्त्वाच्या टिप्ससुद्धा गाडी सुरक्षित ठेवल्यास मदत करू शकतात

Story img Loader