BH-Series Foe New Vehicle: भारत सरकारने वाहनांसाठी एक नवीन सीरीज जारी केली आहे. याचा मोठा फायदा अनेकांना होणार आहे. सरकारच्या या निर्णयाने लाखो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही एका अशा कंपनीत काम करता जेथे तुमची बदली राज्यात कुठेही होऊ शकते. तर तुम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने नवीन वाहनांसाठी भारत सीरीज सुरू केली आहे. नवीन सीरीजमधील वाहनांची नोंदणी संपूर्ण भारतात वैध असेल आणि या सीरीजमधील नोंदणी क्रमांकाच्या आधारे आपली गाडी देशाच्या कोणत्याही भागात बिनधास्तपणे वापरण्यास सक्षम असतील.

सरकारने बुधवारी संसदेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने देशभरात नवीन वाहनांसाठी नवीन BH म्हणजेच भारत सीरीजमध्ये नोंदणी चिन्ह सादर केले आहे. संसदेत लेखी निवेदनात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नवीन वाहनांसाठी नवीन नोंदणी चिन्ह-भारत सीरीज (BH सीरीज) सादर करण्यात आली आहे. या बदलाची अधिसूचना या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने G.S.R 594 (E) द्वारे जारी केली होती.

savitribai phule pune university audit news in marathi
संशोधन केंद्रांबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय… होणार काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
Budget 2025 Prices of Electric vehicles to get cheaper
Budget 2025 : इलेक्ट्रिक वाहनांबाबत निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! अर्थसंकल्पातील निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार ‘हे’ फायदे
Environmental clearance from the state itself revised notification issued by the central government Mumbai news
राज्यातूनच पर्यावरणविषयक परवानगी, केंद्र सरकारकडून सुधारित अधिसूचना जारी; गृहप्रकल्पांना दिलासा
कोल्हापूर विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया रखडली; सतेज पाटील, लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल
financial news loksatta
राज्य उत्पन्नाच्या प्रभावी अंदाजासाठी माहितीची गतीमान देवाणघेवाण आवश्यक, राज्य उत्पन्न सल्लागार समितीच्या बैठकीचा सूर

हे नोंदणी चिन्ह असलेल्या खाजगी वाहनाला वाहनाचा मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यावर वाहनासाठी नवीन नोंदणीची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, “भारत सीरीज (BH-Series)” अंतर्गत ही वाहन नोंदणी सुविधा संरक्षण कर्मचारी, केंद्र सरकार/राज्य सरकारे/केंद्र सरकार/राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या/संस्थांच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने उपलब्ध असतील. ज्यांचे कार्यालय चार किंवा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहेत, ते भारतातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये खाजगी वाहनांनी कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करू शकतील.

मोटार वाहन कर दोन वर्षांसाठी किंवा दोनच्या पटीत आकारला जाईल. चौदावे वर्ष पूर्ण झाल्यानंतर, मोटार वाहन कर दरवर्षी आकारला जाईल जो त्या वाहनासाठी पूर्वी आकारलेल्या रकमेच्या अर्धा असेल.

आणखी वाचा : Hero MotoCorp: जबरदस्त ऑफर!, एक रुपयाही खर्च न करता तुमची आवडती बाईक घरी घेऊन जा, फक्त हे काम करावं लागेल

असं आहे नवीन स्वरूप
BH नोंदणीचे स्वरूप YY BH #### XX असं ठेवण्यात आलं आहे. ज्यामध्ये BH प्रथम नोंदणीचे वर्ष दर्शवितो, BH हा भारत सीरीजचा कोड आहे, #### मध्ये 0000 ते 9999 पर्यंत यादृच्छिक संख्या असतील, XX मध्ये AA ते ZZ ही अक्षरे असतील.

अर्ज कसा करायचा ?
तुमच्याकडे योग्य पात्रता असल्यास, तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा खाजगी कंपनीत काम असेल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. मात्र यासाठी चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी, तुम्हाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाइटवर जावे लागेल आणि वाहन पोर्टलवर जावे लागेल.

नवीन वाहन खरेदी करतानाही BH-सीरीज क्रमांक डीलरमार्फत घेता येतो. यासाठी वाहन मालकाला वाहन पोर्टलवर उपलब्ध फॉर्म 20 आणि फॉर्म 60 भरावा लागेल.
खाजगी क्षेत्राशी संबंधित कर्मचार्‍यांना या फॉर्मसह कर्मचारी ओळखपत्र रोजगार प्रमाणपत्रासह सादर करावे लागेल.

आणखी वाचा : Royal Enfield Himalayan : आता जपानमध्ये लॉंच होणार रॉयल एनफिल्ड हिमालयन

BH सीरीजसाठी रोड टॅक्सचं गणित
BH सीरीज क्रमांक प्लेट असलेल्या वाहनांना खरेदीच्या वेळी १५ वर्षांसाठी रोड टॅक्स भरण्याऐवजी दोन वर्षांसाठी आणि त्यानंतर प्रत्येक दोन वर्षांनी रोड टॅक्स भरावा लागेल. पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून १४ व्या वर्षानंतर दरवर्षी मोटार वाहन कर आकारला जाईल, जो आधी आकारलेल्या कराच्या निम्मा असेल.

१० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर ८% कर लागेल. तर १० ते २० लाख रुपये किमतीच्या वाहनांवर १० टक्के कर आकारला जाईल. २० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर १२ टक्के कर लागणार आहे.
डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना नियमित रकमेपेक्षा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांवर निर्धारित रकमेपेक्षा २ टक्के कमी कर आकारला जाईल.

आणखी वाचा : Traffic Rule: ट्रॅफिक चलान जारी केल्यानंतरही पैसे भरावे लागणार नाहीत! हा महत्त्वाचा नियम एकदा वाचाच!

आरसी हस्तांतरणाची जुनी प्रक्रिया काय आहे ?
सरकारने भारत सीरीज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी वाहनधारकांना वाहन दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करण्यासाठी अनेक कठीण प्रक्रियेतून जावे लागले. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ४७ अंतर्गत, दुसर्‍या राज्यात वाहन वापरण्यासाठी १२ महिन्यांच्या आत पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यासाठी वाहन मालकाला जुन्या राज्यातील RTO कडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल आणि नवीन राज्यात रस्ता कर भरल्यानंतर त्याच्या स्थानिक RTO मध्ये कर परतावा मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल. राज्य बदलल्यावर ही प्रक्रिया पुन्हा करावी लागली. पण BH-सीरीज आल्यानंतर या अडचणी दूर झाल्या आहेत.

Story img Loader