भारतात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी मोठ्या प्रमाणात लॉन्च झाल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता लोकंही या गाड्यांना पसंती देतान दिसत आहेत. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीच्या बाबतीत उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक ही तीन प्रमुख राज्ये आघाडीवर आहेत, असे सरकारने बुधवारी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत एका लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “भारतात ८,७०,१४१ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. उत्तर प्रदेशात (२,५५,७००) इतक्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यानंतर दिल्ली (१,२५,३४७) आणि कर्नाटक (७२,५४४) इतक्या वाहनांची नोंद झाली आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर बिहार आणि महाराष्ट्र आहे. बिहारमध्ये (५८,०१४) आणि महाराष्ट्रात (५२,५०६) इलेक्ट्रिक गाड्यांची नोंद झाली आहे.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा