Upcoming 7 Seater MPV: भारतात अधिक आसन क्षमता असलेल्या गाड्या अधिक पसंत केल्या जातात. अनेकजण आपल्या कुटुंबियांच्या विचार करून कार खरेदी करतात. यात मोठं कुटुंब असल्यास अनेक लोक सात सीटर कार खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. टोयोटाने आता आपल्या इनोव्हा दोन मॉडेल्समध्ये विकण्यास सुरुवात केली आहे, पहिले मॉडेल इनोव्हा हायक्रॉस आणि दुसरे इनोव्हा क्रिस्टा. याशिवाय मारुतीकडे मारुती XL6 आणि मारुती Ertiga असे दोन मॉडेल्स आहेत. किआ आपले केरेन्स हे सेव्हन सीटर मॉडेल म्हणून विकते. पण लवकरच ग्राहकांसाठी आणखी पर्याय जोडले जाणार आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी ७ सीटर कारची यादी घेऊन आले आहोत जे लवकरच बाजारात दाखल होणार आहेत.
Maruti Suzuki Engage
मारुती सुझुकी भारतीय बाजारात आणखी एक सात सीटर कार आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आधीच Engage नावासाठी ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. काही काळापूर्वी आलेल्या टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल असे मानले जाते. ही भागीदारी अंतर्गत मारुती सुझुकीची री-बॅज केलेली आवृत्ती म्हणून आणली जाऊ शकते. इनोव्हा हायक्रॉस सात आणि आठ सीटर मॉडेल्समध्ये विकली जाते आणि त्यात ADAS सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. यामध्ये तुम्हाला २.० लीटर पेट्रोल आणि २.० लीटर मजबूत हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. असे मानले जात आहे की, मारुती सुझुकीची नवीन सात सीटर कार पुढील दोन महिन्यांत सादर होऊ शकते.
(हे ही वाचा : ६ Airbags सोबत येणाऱ्या देशातील ‘या’ ७ सीटर कारसमोर XUV700-Safari ही विसरुन जाल, किंमत…)
Toyota Ertiga
मारुती सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारीअंतर्गत आणखी एक सात सीटर कार येऊ शकते जी टोयोटाकडून आणली जाईल. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर टोयोटा मारुती एर्टिगा वर आधारित एमपीव्ही लाँच करू शकते. कंपनी आधीच दक्षिण आफ्रिकेत Ertiga चे रीबॅच व्हर्जन रुमियन नावाने विकते.
Nissan Triber
निसान आणि रेनॉल्ट भारतीय बाजारपेठेत एकत्र काम करत आहेत. या भागीदारी अंतर्गत, निसान लवकरच भारतात MPV लाँच करू शकते, जी Renault Triber वर आधारित असेल. ट्रायबर ही देशातील सर्वात स्वस्त 3-रो MPV आहे. Nissan सुद्धा त्याच किमतीच्या सेगमेंटमध्ये त्याची MPV आणू शकते, जरी त्यात थोडी अधिक प्रीमियम वैशिष्ट्ये असू शकतात. यात मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री आणि स्टार्ट/स्टॉप बटण मिळायला हवे.
या तिन्ही कारच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असतील, अशा चर्चा आहेत.