भारताच्या ऑटो सेक्टरमध्ये २०२२ च्या पहिल्या तिमाहीत सर्व कार निर्मात्यांनी त्यांच्या सध्याच्या कार नवीन अपडेटसह लाँच केल्या आहेत. काही कंपन्यांनी त्यांच्या नवीन कार बाजारात आणल्या आहेत. तुम्‍ही नवीन खरेदी करण्‍याचा विचार करत असाल तर, भारतात लवकरच लाँच होणार्‍या कार, हॅचबॅक, एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक कारपर्यंत जाणून घ्या.

Maruti XL6: मारुती XL6 ही त्याच्या कंपनीची एक प्रीमियम एसयूव्ही आहे. या गाडीची फेसलिफ्ट आवृत्ती कंपनी २१ एप्रिल रोजी लाँच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या एसयूव्हीमध्ये हेड अप डिस्प्ले, ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरासह काही नवीन वैशिष्ट्ये जोडू शकते.

Volkswagen Virtus: फोक्सवॅगन या नवीन कारवर वेगाने काम करत आहे, कंपनी भारतीय बाजारपेठेत ही गाडी दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच मे-जूनमध्ये लाँच करू शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी दोन इंजिन पर्यायांसह ऑफर करेल ज्यामध्ये पहिले इंजिन १.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल आणि दुसरे इंजिन १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल.

Next Generation Mahindra Scorpio 2022: महिंद्रा स्कॉर्पिओ ही आपल्या कंपनीसह एसयूव्ही सेगमेंटमधील एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. कंपनी बाजारपेठेतील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन नवीन अवतारात सादर करणार आहे. कंपनी गाडीच्या एक्सटीरियरपासून इंटीरियरपर्यंत अनेक गोष्टी अपडेट करणार आहे. यात पॅनोरॅमिक सनरूफ मिळण्याची चर्चाही समोर आली आहे. दिवाळीत कंपनी ही गाडी लाँच करू शकते.

Top 3 MPV: सात सीटर कार खरेदी करायची आहे? ‘या’ गाड्यांना सर्वाधिक मागणी

Tata Tigor EV Long Range: टाटा मोटर्स त्याच्या इलेक्ट्रिक सेडानची अद्ययावत आवृत्ती लाँच करणार आहे. यामध्ये सध्याच्या बॅटरी पॅकपेक्षा मोठा बॅटरी पॅक दिला जाईल. हा पॅक मिळाल्यानंतर या इलेक्ट्रिक कारची रेंज १०० किमीने वाढण्याची शक्यता आहे. कंपनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात लाँच करू शकते.

Tata Nexon EV Long Range: टाटा मोटर्स देखील तिची विद्यमान इलेक्ट्रिक एसयूव्ही Nexon अपडेट करून लाँग रेंज व्हर्जन लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपडेटेड Tata Nexon EV ची रेंज ४०० किमी पेक्षा जास्त असेल. दिवाळीत कंपनी ही गाडी लाँच करू शकते.

Story img Loader