Upcoming Maruti Cars in India: मारुती सुझुकी देशातली पहिल्या क्रमांकाची वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनी देशात सर्वात जास्त एंट्री लेव्हल कार्स विकते. भारतात या सेगमेंटमधील वाहनांना मोठी मागणी आहे. त्यामुळेच कंपनी बाजारातील पहिल्या क्रमांकाची कार आहे. आता मारुती सुझुकी देशातील बाजारपेठेत मोठा धमाका करणार आहे. मारुती देशातील बाजारात लवकरच आपल्या कार नव्या अवतारात दाखल करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुती सुझुकी अनेक नवीन कार तयार करत आहे. २०२४ च्या सुरुवातीस, आपल्याला नवीन पिढीच्या स्विफ्ट हॅचबॅक आणि डिझायर कॉम्पॅक्ट सेडान बघायला मिळू शकतात. दोन्ही नवीन मॉडेल्समध्ये नवीन डिझाइन आणि अधिक चांगली वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, कंपनी २०२५ मध्ये eXV संकल्पना-आधारित इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे. याशिवाय, ग्रँड विटारावर आधारित सात-सीटर एसयूव्ही ही येत्या काही वर्षांत बाजारात लाँच होण्याची अपेक्षा आहे.

New-Gen Maruti Suzuki Swift\Dzire

नेक्स्ट जनरेशन सुझुकी स्विफ्ट आणि डिझायरमध्ये डिझाइन, फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत मोठे बदल पाहायला मिळू शकतात. दोन्ही मॉडेल्समध्ये १.२L, ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल, जे टोयोटाच्या स्ट्राँग हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज देखील असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोन्ही २०२४ मध्ये भारतात लाँच केले जाऊ शकतात आणि त्यांचे मायलेज ३५-४० किमी पर्यंत असू शकते. या कारची किमतही कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(हे ही वाचा : बुलेट, हंटरही विसरुन जाल, देशात येतेय Royal Enfield ची नवी बाईक, पहिल्या फोटोची सोशल मिडीयावर धूम, किंमत… )

Maruti Suzuki eVX इलेक्ट्रिक एसयूव्ही

मारुती सुझुकी eVX संकल्पनेवर आधारित इलेक्ट्रिक SUV ही देशातील इंडो-जपानी ऑटोमेकरची पहिली इलेक्ट्रिक कार असेल. हे भारतात २०२५ मध्ये लाँच केले जाऊ शकते. इलेक्ट्रिक एसयूव्ही नाविन्यपूर्ण बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. त्याची लांबी ४३०० मिमी, रुंदी १८०० मिमी आणि उंची १६०० मिमी असल्याचा अंदाज आहे. EV मध्ये ६०kWh बॅटरी पॅक असू शकतो, जो एका चार्जवर ५०० किमीची रेंज देऊ शकतो.

मारुती सात-सीटर एसयूव्ही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी एक नवीन थ्री-रो SUV बनवत आहे, ज्याचे सध्या कोडनेम Y17 आहे. ग्रँड विटारावर आधारित ही एसयूव्ही असू शकते. मॉडेलमध्ये सौम्य हायब्रीड तंत्रज्ञानासह १.५L K१५C पेट्रोल इंजिन आणि टोयोटाची १.५L अॅटकिन्सन सायकल पेट्रोल पॉवरट्रेन असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming maruti cars in india maruti suzuki is expected to launch four cars in the year 2024 2025 pdb
Show comments