Upcoming scooter 2023: नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. हा नवा वर्ष तुमच्यासाठी खास असणार आहे. कारण या नव्या वर्षात तुम्हाला जर एखादी दमदार स्कूटर खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या नव्या वर्षात तुमच्यासाठी भारतीय वाहन बाजारात दमदार स्कूटर सादर केल्या जाणार आहेत. या स्कूटर चांगल्या डिझाईनसह येतील. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या स्कूटर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ स्कूटर होणार लाँच

Lambretta V125
Lambretta Scooters ने अलीकडेच मिलान डिझाईन वीक २०२२ मध्ये दोन नवीन मॉडेल G350 आणि X300 लाँच केले. या स्कूटर्स सध्या आंतरराष्ट्रीय बाजारासाठी लाँच करण्यात आल्या आहेत. भारत ही स्कूटरसाठी जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यात Lambretta त्याचे नवीन मॉडेल Lambretta V125 एप्रिल २०२३ मध्ये लाँच करेल अशी अपेक्षा आहे. त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असण्याची शक्यता आहे

Okinawa Cruiser
Okinawa या कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okinawa Cruiser भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. ही मॅक्सी स्कूटर असेल, जी ऑटो एक्सपो २०२० मध्ये सादर करण्यात आली होती. आता ही स्कूटर नव्याने अपडेट करुन लाँच करण्यात येणार आहे. त्याची किंमतही एक लाख रुपयांपर्यंत असू शकते.

(हे ही वाचा << ‘Hero Vida V1’ इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू; सध्या ‘या’ शहरांमध्ये उपलब्ध, 165KM ची मिळेल रेंज )

Hero eMaestro

हीरो मैस्ट्रो स्कूटर तिच्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरच्या गणनेत येते. आता कंपनी Hero eMaestro स्कूटर जानेवारी २०२३ मध्ये लाँच केली जाऊ शकते. या स्कूटरची किंमत जवळपास सुमारे १ लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

Honda Activa 7G
भारतीय बाजारपेठेत Honda Activa ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. भारत ही स्कूटर खूप पसंत केली जाते. होंडा दर दोन वर्षांनी नवीन जनरेशन अ‍ॅक्टिव्हा लॉन्च करते. सध्या Activa 6G ची विक्री सुरु आहे. कंपनी आता लवकरच आपली सेव्हेन जनरेशन Activa 7G लॉन्च करू शकते. Activa 7G नवीन हायब्रिड इंजिनसह येईल. त्याची किंमत सुमारे ८०,००० रुपये असू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming scooter 2023 to be launched in the market lambretta v125 okinawa cruiser great mileage scooter know launch date price pdb