Upcoming Tata Cars In India : टाटा मोटर्सच्या कारला भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच मोठी मागणी असते. अशात तुम्हीही नवीन वर्षात टाटा कार खरेदी करण्याचा विचार करत असात तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण टाटा मोटर्स पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये भारतीय बाजारपेठेत त्यांचे अनेक नवीन कार मॉडेल्स लाँच करणार आहे. न्यूज वेबसाइट GaadiWaadi ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स २०२५ मध्ये आपल्या कारमध्ये इलेक्ट्रिक आणि फेसलिफ्ट मॉडेल्सचाही समावेश करणार आहे. अशाच कंपनीच्या पुढील वर्षात लाँच होणाऱ्या नव्या ३ कारविषयी तपशीलवार जाणून घेऊ…
टाटा टियागो फेसलिफ्ट (Tata Tiago Facelift)
)
टाटा टियागो फेसलिस्ट (Tata Tiago) ही भारतीय ग्राहकांमध्ये सर्वाधिक विकली जाणारी हॅकबॅच कार आहे. आता कंपनी या कारचे अपडेटेड व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याच्या तयारीत आहे. अपडेटेड टाटा टियागोमध्ये ग्राहकांना नवीन हेडलॅम्प, टेललॅम्प, बंपर आणि नवीन फीचर्ससह इंटीरियरमध्ये बदल दिसेल. मात्र या कारच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
टाटा टिगोर फेसलिफ्ट (Tata Tigor Facelift)
टाटा टिगोर ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय सेडान कारपैकी एक आहे. आता कंपनी टाटा टिगोर अपडेट करणार आहे. ही अपडेटेड टाटा टिगोर कार पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ग्राहकांना टाटा टिगोर फेसलिफ्टच्या आतील आणि बाहेरील भागात मोठे बदल दिसतील. पण कारच्या पॉवरट्रेनमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत.
टाटा हॅरियर ईव्ही (Tata Harrier EV)
टाटा हॅरियर ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. आता कंपनी पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये टाटा हॅरियरचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान टाटा हॅरियर ईव्ही ही कार चाचणी दरम्यान भारतीय रस्त्यांवर धावताना दिसली, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनी टाटा हॅरियर ईव्ही मध्ये 60 KWh बॅटरी वापरु शकते जी ग्राहकांना एका चार्जवर सुमारे ५०० किलोमीटरची रेंज देईल.