Tata Upcoming Cars: टाटाने प्रिमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये त्यांची एन्ट्री २०२० मध्ये त्यांच्या अल्ट्रोजच्या माध्यमातून केली होती. तेव्हापासून आतापर्यंत मार्केटमध्ये या मॉडेलचं चांगलं प्रदर्शन बघायला मिळालं आहे. आता कंपनी यावर्षी हॅचबॅकचे दोन नवीन प्रकार आणण्याची योजना आखत आहे. Tata Ultroz CNG आणि Ultroz Racer या वर्षी लाँच केले जाऊ शकतात. दोन्ही मॉडेल्स २०२३ ऑटो एक्सपोमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आले होते.
टाटाच्या ‘या’ कार येणार बाजारात
Tata Altroz CNG
Tata Altroz CNG १.२L पेट्रोल इंजिनसह येईल, त्यात फॅक्टरी-फिट केलेले CNG किट जोडले जाईल. CNG मोडवर, हे इंजिन ७७PS कमाल पॉवर आणि ९५Nm पीक टॉर्क जनरेट करेल. सेटअप ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडला जाईल. विशेष म्हणजे, मॉडेलला नवीन ड्युअल सिलेंडर सेटअप मिळेल आणि प्रत्येक सिलेंडरची क्षमता ३० लीटर असेल.
एकल प्रगत ECU (इंजिन कंट्रोल युनिट) आणि लीकेज डिटेक्शन टेक्नॉलॉजीसह डायरेक्ट स्टेट सीएनजी असलेली ही त्याच्या वर्गातील पहिली कार आहे. हे जलद इंधन भरणे, इंधन दरम्यान ऑटो स्विच आणि मॉड्यूलर इंधन फिल्टर यांसारख्या वैशिष्ट्यांसह येईल. त्याचे मायलेज जवळपास २६ kmpl किंवा त्याहूनही जास्त असू शकते.
(हे ही वाचा : Nexon EV, Mahindra e-Verito नव्हे, ‘ही’ ठरली देशातली सर्वात वेगवान E-Car, मिळाला फास्टेस्ट ईव्ही ड्राईव्हचा पुरस्कार )
Tata Altroz Racer
Tata Altroz Racer ची स्पर्धा Hyundai i20 N Line शी होईल, जी १.०L टर्बो पेट्रोल इंजिन (११८bhp) आणि ६-स्पीड iMT आणि ७-स्पीड DCT गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे. Ultroz Racer मध्ये १.२L, ३-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जे ५,५००rpm वर १२०PS पॉवर आणि १,७५०rpm ते ४,०००rpm दरम्यान १७०Nm पीक टॉर्क जनरेट करेल.
हे टर्बो-पेट्रोल युनिट नेक्सॉन सबकॉम्पॅक्ट मॉडेल लाइनअपमध्ये देखील उपलब्ध आहे. हॅचबॅकच्या रेसर व्हेरियंटमध्ये १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जिंग, व्हेंटिलेटेड सीट्स, व्हॉईस ऍक्टिव्हेटेड इलेक्ट्रिक सनरूफ आणि ६ एअरबॅग्ज यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.