Toyota Unveiled Urban Cruiser EV : टोयोटाने मारुती ईव्हीएक्सवर (eVX) आधारित अर्बन एसयूव्ही कन्सेप्ट प्रदर्शित केल्याच्या एक वर्षानंतर कंपनीने अखेरीस टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही (Urban Cruiser EV) नावाच्या नवीन व्हर्जनचे अनावरण केले आहे. हे नवीन मॉडेल थोडेसे लहान आणि नुकत्याच लाँच झालेल्या सुझुकी ई विटारा (Suzuki e Vitara)शी बरेच साम्य आहे, जे भारतात मारुती ब्रॅण्डअंतर्गत विकले जाते. म्हणजेच ही ईव्ही सुझुकी ई विटाराची धाकटी बहीण (sister model) आहे, असे म्हणायला हरकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिझाइन आणि आकार –

अर्बन क्रूझर ईव्हीच्या (Urban Cruiser EV) डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत. लोखंडी जाळी, पातळ हेडलाइट्स, गाडीच्या फ्रंटवर अधिक गोलाकार असणारा बंपर, गाडीत ब्लॅक प्लॅस्टिक क्लेडिंग, १८ किंवा १९ इंच चाके, ई विटाराप्रमाणेच सी-पिलरमध्ये मागील दरवाजाचे हॅण्डल जोडलेले आहेत. मागील बाजूस टेल लाइट्स, रूफ स्पॉयलर, स्टर्डी रिअर बंपर आणि ग्राहक टू-टोन पर्यायांसह ब्लॅक रूफचे रंग पर्याय निवडू शकतात.

बॅटरी आणि परफॉर्मन्स –

टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही (Urban Cruiser EV) ही ई-विटारासारख्या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये 49kWh आणि 61kWh च्या बॅटरी पॅक पर्यायांचा समावेश आहे. लहान बॅटरी असलेल्या मॉडेलमध्ये समोरच्या एक्सलवर एक मोटर आहे, जी 144 पॉवर आणि 174 टॉर्क जनरेट करते. तसेच मोठ्या बॅटरीसह एक ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) मॉडेलदेखील उपलब्ध असेल, ज्यामध्ये चांगल्या कार्यक्षमतेसाठी अतिरिक्त मागील मोटर वैशिष्ट्यीकृत आहे. त्यामुळे ती 184 पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. या AWD आवृत्तीमध्ये हिल डिसेंट कंट्रोल आणि खडबडीत रस्त्यांवर चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी ‘ट्रेल मोड’सारखी फीचर्ससुद्धा उपलब्ध आहेत.

हेही वाचा…आता चिंता सोडा! नवीन Honda Amaze ला मिळेल ‘सीएनजी’चा पर्याय, पण त्यात एक ट्विस्ट?

इंटेरिअर फीचर्स –

ईव्हीमध्ये आधुनिक डॅशबोर्ड लेआउट, दोन-स्पोक स्टेअरिंग व्हील, इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एकपेक्षा जास्त ड्रायव्हिंग मोड, सिंगल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, तसेच यातील सुविधा ॲपल कारप्ले, ॲण्ड्रॉइड ऑटो या दोन्हींना सपोर्ट करते. हाय ट्रिम्समध्ये पॉवर्ड ड्रायव्हर सीट ॲडजस्टमेंट, प्रीमियम जेबीएल ऑडिओ सिस्टीम, सनरूफ यांसारखे अपग्रेड, तर मागील सीट्स सरकतात आणि वाकूसुद्धा शकतात आणि त्यांना स्प्लिट-फोल्डिंगसाठी पर्यायसुद्धा दिला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अर्बन क्रूझर ईव्हीमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट फीचर्स असणार आहेत जसे की प्री-कॉलिसीन (टक्कर होण्याआधी सावधगिरीचा इशारा), अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर अलर्ट, तर मारुतीच्या मॉडेलप्रमाणेच सहा एअरबॅग्ज असणार आहेत.

भारतात कधी होणार लाँच?

भारतात टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही अधिकृतपणे कधी लाँच होणार याची तारीख अद्याप जाहीर केली गेली नसली तरी ती २०२५ मध्ये लाँच होईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urban cruiser ev toyota revealed smaller and lot of similarities suzuki e vitara check out features asp