Urfi Javed New SUV: बिग बॉस OTT मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.  पण अलीकडे ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिची नवी लग्झरी एसयूव्ही आहे. उर्फी जावेद अनेकदा फोटोग्राफर्सना भेटवस्तू देताना दिसते, पण यावेळी तिने स्वतःला एक निळ्या रंगाची SUV गिफ्ट केली आहे, ज्याचा व्हिडीओ आणि फोटो त्याने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Urfi Javed Jeep Compass

उर्फी जावेदने जी निळ्या रंगाची एसयूव्ही खरेदी केली आहे ती जीप कंपास ही लक्झरी एसयूव्ही आहे. भारतातील या SUV ची किंमत रु. २१.०९ लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी रु. ३१.२९ लाखांपर्यंत जाते. मात्र, या एसयूव्हीचा कोणता प्रकार उर्फीने खरेदी केला आहे, याचा खुलासा झालेला नाही.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
Bigg Boss Marathi Fame Nikhil Damle bought new car watch video
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निखिल दामलेने खरेदी केली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
Navri Mile Hitlarla
पाडवा साजरा करण्यासाठी लीलाने केली युक्ती; टायगरला बोलवताच एजेने…; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

Jeep Compass Engine and Transmission

उर्फी जावेदने जी जीप कंपास खरेदी केली आहे, त्यात कंपनीने दोन इंजिनांचा पर्याय दिला आहे. पहिले इंजिन १.४L टर्बो पेट्रोल आहे जे १६३PS पॉवर आणि २५०Nm पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन २-लिटर डिझेल इंजिन आहे जे १७२ PS पॉवर आणि ३५० Nm पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनसह, कंपनी ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देते.

(हे ही वाचा: Sushant Singh Rajput’s Car: सुशांतची ‘ही’ आवडती लक्झरी कार पाहताच, चाहते म्हणाले, “तू नेहमीच…” Video Viral )

Jeep Compass वैशिष्ट्ये

उर्फी जावेद यांच्या मालकीची जीप कंपास अनेक लक्झरी आणि हाय-टेक वैशिष्ट्यांसह येते. कार कनेक्टेड टेकसह १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, १०.२५-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर टेलगेट, वायरलेस फोन चार्जिंग, ऑटो एसी आणि ३६०-डिग्री व्ह्यू कॅमेरा या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे.

Jeep Compass सुरक्षा वैशिष्ट्ये

सुरक्षा वैशिष्ट्ये लक्षात घेऊन, जीप कंपासमध्ये EBD सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रोलओव्हर मिटिगेशन आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.